Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: सलग दोनदा UPSC क्रॅक; इंटरव्ह्यूमध्ये विचारला होता 3 इडियट्सचा प्रश्न; IPS मोहन शक्ती अवस्थी आहेत तरी कोण?

Success Story of IPS Shakti Mohan Awasthi: आयपीएस शक्ती मोहन अवस्थी यांनी सलग दोनवेळा यूपीएससी परीक्षा पास केली आहे. ते तिसऱ्या प्रयत्नात आयपीएस अधिकारी झाले.

Siddhi Hande

आयपीएस मोहन शक्ती यांचा प्रवास

सलग दोनदा यूपीएससी पास

तिसऱ्या प्रयत्नात झाले IPS अधिकारी

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड आणि प्रतिष्ठित परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते.यूपीएससी परीक्षा देताना सर्व गोष्टींचे ज्ञान तुम्हाला असायला हवे. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींची माहिती असायला हवी. तुम्हाला कधीही कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही तयार असायला हवे. असेच एक उदाहरण म्हणजे आयपीएस शक्ती मोहन अवस्थी. त्यांना यूपीएससी परीक्षेत ३ इडियट्सबद्दल प्रश्न विचारला होता.

तिसऱ्या प्रयत्नात यश

आयपीएस मोहन शक्ती यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. त्यांनी सलग तीन वेळा यूपीएससी परीक्षा दिली. त्यांना तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले. त्यांनी २०१८ मध्ये सिविल परीक्षेत १५४ रँक प्राप्त केली.

पहिल्या प्रयत्नात ते इंटरव्ह्यूपर्यंत पोहचले. दुसऱ्या प्रयत्नात त्यांची निवड आयआरएस म्हणजेच इंडियन रेवेन्यू सर्व्हिससाठी झाली. यानंतर तिसऱ्या प्रयत्नात ते आयपीएस अधिकारी झाले.

शक्ति मोहन अवस्थी हे मूळचे लखनऊचे रहिवासी आहेत.त्यांनी सुरुवातीचे शिक्षण लखनऊमधूनच पूर्ण केले. यानंतर बिहारमधील बीआयटी मेसरा येथून सिविल इंजिनियरिंगमध्ये बीटेक पूर्ण केले.

शक्ती मोहन अवस्थी यांना इंटरव्ह्यूमध्ये ३ इडियट्स चित्रपटाशीसंबंधित प्रश्न विचारला होता. त्यांना विचारले होते की, जर तुम्ही शरमन जोशीला भेटला तर त्यांना काय प्रश्न विचाराल. यावर त्यांनी चित्रपटाचा गाजलेला 'आप अपनी नौकरी रखिए, मैं अपना एटीट्यूड रख लेता हूं' हा डायलॉग ऐकवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर अपघात, मालवाहू टेम्पो 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळ्याची घटना

Padmadurg Fort: समुद्रातील अभेद्य जलदुर्ग! छत्रपती शिवाजी महाराजांनी का बांधला होता पद्मदुर्ग किल्ला?

LPG Gas Rules : इस्रायल-इराण युद्धाची झळ स्वयंपाक घराला, एलपीजी सिलिंडरच्या नियमांमध्ये मोठा बदल

Iran- Israel Conflict: इराण पेटलं! इस्राइलकडून तेलसाठ्यांवर हल्ला, तेहरानमध्ये अग्नितांडव; पाहा VIDEO

Kanji Vada Recipe: अमरावतीतला फेमस कांजी वडा बनवण्याची सोपी रेसिपी लगेचच घ्या जाणून, नाश्त्यासाठी बेस्ट डिश

SCROLL FOR NEXT