IPS सरोज कुमारी यांचा प्रेरणादायी प्रवास
रोज शाळेसाठी करायच्या ६ किमी पायपीट
मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC
प्रत्येकाचे काही न काही स्वप्न असते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण दिवसरात्र मेहनत करतात. असंच स्वप्न सरोज कुमारी यांचंही होतं. त्यांना प्रशासकीय सेवेत काम करायचे होते. त्यांनी आपले हे स्वप्न पूर्ण केले. त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. त्या आज आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
सरोज कुमारी या मूळच्या राजस्थानच्या रहिवासी. त्यांचे बालपण खूप कठीण परिस्थिती गेले. त्यांना मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीही संघर्ष करावा लागत होता. परंतु परिस्थिती कितीही वाईट असली तरीही त्यातून सरोज कुमारी यांनी मार्ग काढला. त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले.
शाळेसाठी ६ किमी पायपीट
सरोज कुमारी यांचा जन्म राजस्थानमधील झुंझनू जिल्ह्यातील एका गावात झाला. त्यांचे वडील हे आर्मीतून रिटायर्ड हवलदार होते. परंतु त्यांना पेन्शन कमी होती. यामुळे घर चालवण्यासाठी खूप अडचणी यायच्या. सरोज यांनी ८वी पर्यंतचे शिक्षण सरकारी शाळेत केले.
सरोज यांनी गावाशेजारीत सरकारी शाळेत अॅडमिशन घेतले.त्यांची शाळा गावापासून ६ किलोमीटर दूर होती. तिथे जाण्यासाठी कोणतेही साधन नव्हते. यामुळे सरोज रोज ६ किमी पायपीट करत जायच्या. सरोज यांनी १२वीच्या परीक्षेत टॉप केले होते.
सरोज या पहिल्यापासून अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी जयपुरमधील महारानी कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले होते. त्यांनी तिथेच लेक्चरर म्हणून नोकरी केली. परंतु त्यांनी प्रशासकीय सेवेत काम करायचे होते. यूपीएससी परीक्षा त्यांनी पास केली. त्यांना गुजरात कॅडरमध्ये पोस्टिंग मिळाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.