Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: मालिकेतून प्रेरणा मिळाली, ६ नोकऱ्या सोडल्या, तिसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS संगीता कालिया यांचा प्रवास

Success Story of IPS Sangeeta Kalia: आयपीएस संगीता कालिया या अनेकदा चर्चेत असतात. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आहेत. यासाठी त्यांनी ६ नोकऱ्या सोडल्या होत्या.

Siddhi Hande

आयपीएस संगीता कालिया यांचा प्रवास

६ नोकऱ्या सोडल्या आणि केली यूपीएससी परीक्षेची तयारी

कारपेंटरची लेक झाली IPS अधिकारी

यूपीएससी परीक्षा ही सर्वात अवघड परीक्षांपैकी एक आहे. यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागतो. याचसोबत तुमची इच्छाशक्तीही मजबूत असणे गरजेचे आहे. अपयशाचा सामना करता यायला हवा. असंच काहीसं संगीत कालिया यांनी केलं. त्यांनी आपली मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

संगीता या एक निर्भीड आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी प्रशासकीय सेवेत रुजू होऊन त्यात काहीतरी बदल करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्या काम करत आहे.

आयपीएस संगीता कालिया या मूळच्या हरियाणाच्या भवानी जिल्ह्याच्या रहिवासी आहे. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९८७ रोजी झाला. त्यांचे वडील धर्मपाल पोलिस विभागात पेंटर होते. २०१० मध्ये ते रिटायर झाले. संगीता यांनी लहानपणीच आयपीएस होण्याचे ठरवले होते.

संगीता यांनी २००५ मध्ये सर्वात आधी यूपीएससी (UPSC) परीक्षा दिली होती. पहिल्या दोन प्रयत्नात त्यांना अपयश मिळाले होते. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात परीक्षा पास केली आणि आयपीएल अधिकारी झाल्या.

उडान मालिकेतून मिळाली प्रेरणा

संगीता कालिया यांच्या मते, त्यांना पोलिस होण्याची प्रेरणा ही उडान मालिका बघून झाली. त्यांनी सहा नोकऱ्या सोडून आयपीएस होण्याचे ठरवले आणि त्यांनी यासाठी प्रयत्न केला.

आयपीएस संगीता कालिया यांचे शिक्षण हरियाणातील प्रायव्हेट शाळेत झाले. यानंतर त्यांनी अशोका युनिव्हर्सिटीमधून इकोनॉमिक्समध्ये मास्टर्स डिग्री प्राप्त केली. पोस्ट ग्रॅज्युएशन होण्यापूर्वी त्यांचे वडील रिटायर होतील असं त्यांना वाटलं. त्याआधीच आपण पोलिस दलात रुजू व्हायला हवं. यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ज्या वर्षी वडील रिटायर झाले त्याच वर्षी त्यांना नोकरी मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha reservation: मनोज जरांगेंना अवघ्या 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी, काय आहेत न्यायालयाच्या अटी

Tariff War: पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शनमोडवर! ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात आखला 'स्पेशल ४०'चा प्लॅन

Raj And Uddhav Thackeray Meets: तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, ठाकरे बंधूंच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

Maharashtra Live News Update: पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर कारने घेतला पेट

Manoj Jarange Patil: हवं तर गोळ्या घाला’; जरांगे पाटील मुंबईकडे रवाना, सरकारवर आडकाठीचा आरोप

SCROLL FOR NEXT