बिझनेस

iPhone Air Launch: Apple चा नवा धमाका! आतापर्यंतचा सर्वात स्लिम स्मार्टफोन बाजारात, भारतातील किंमत वाचून व्हाल थक्क

Apple Slimmest iPhone: ॲपलने आपला सर्वात पातळ स्मार्टफोन iPhone Air लाँच केला आहे. फक्त ५.६ मिमी जाडी असलेला हा आयफोन, पूर्वीच्या ६.९ मिमी iPhone 6 पेक्षा हलका असून ४८MP कॅमेरा देतो.

Dhanshri Shintre

  1. ॲपलने सर्वात पातळ स्मार्टफोन आयफोन एअर लाँच केला, जाडी फक्त ५.६ मिमी

  2. भारतात सुरुवातीची किंमत ₹१,१९,९०० असून २५६GB, ५१२GB आणि १TB व्हेरिएंट उपलब्ध

  3. ६.५ इंचाचा डिस्प्ले, १२०Hz रिफ्रेश रेट आणि ३,००० निट्स ब्राइटनेस

  4. A19 प्रो चिपसेट, ४८MP कॅमेरा आणि मजबूत टायटॅनियम फ्रेमसह प्रीमियम डिझाइन

ॲपलने अखेर त्यांचा आतापर्यंतचा सर्वात पातळ स्मार्टफोन बाजारात आणला असून त्याचे नाव आयफोन एअर ठेवण्यात आले आहे. केवळ ५.६ मिमी जाडी असलेला हा स्मार्टफोन डिझाइन आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम मानला जात आहे. भारतात या डिव्हाइसची सुरुवातीची किंमत १,१९,९०० रुपये ठेवण्यात आली असून यात २५६ जीबी इंटरनल स्टोरेज दिले आहे. तसेच हा फोन ५१२ जीबी आणि १ टीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, ज्यासाठी अनुक्रमे १,३९,९०० रुपये आणि १,५९,९०० रुपये मोजावे लागतील.

कंपनीचा दावा आहे की आयफोन एअर Reynolds 045 पेनपेक्षा पातळ आहे. त्या पेनची जाडी ०.७ मिमी असली तरी या फोनचे डिझाइन अधिक स्लिम असल्याने त्याला वेगळी ओळख मिळत आहे. याशिवाय, Samsung Galaxy S मालिकेतील सर्वात पातळ मॉडेल Galaxy S25 Edge देखील iPhone Air पेक्षा जाड आहे.

iPhoen Air चे वैशिष्ट्ये

या फोनमध्ये ६.५ इंचाचा प्रोमोशन डिस्प्ले असून त्यात १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ३,००० निट्सचा पीक ब्राइटनेस दिला आहे. टिकाऊपणाबाबत ॲपलने सांगितले आहे की, पातळ डिझाइन असूनही या स्मार्टफोनमध्ये उत्तम मजबुती आहे. यात सिरेमिक शील्डचा वापर करण्यात आला असून दोन्ही बाजूंनी टायटॅनियम फ्रेम बसवण्यात आली आहे.

आयफोन एअर बॅटरी बॅकअप

प्रोसेसिंग पॉवरबाबत बोलायचे झाले तर आयफोन एअरमध्ये A19 प्रो चिपसेट देण्यात आला आहे. यासोबतच नवा C1x मोडेम आहे, जो मागील C1 च्या तुलनेत दुप्पट वेगवान असल्याचा कंपनीचा दावा आहे. बॅटरीबाबत कंपनीने सांगितले आहे की, हा फोन एकदा पूर्ण चार्ज केल्यावर सहजपणे दिवसभर चालतो आणि ४० तासांचा व्हिडिओ प्लेबॅक देतो.

आयफोन एअरचा कॅमेरा सेटअप

कॅमेऱ्याच्या बाबतीत हा डिव्हाइसही विशेष ठरत आहे. यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असून ४८ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि १८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा फोन फक्त eSIM सपोर्टसह उपलब्ध असून त्याच्या डिझाइन आणि फीचर्समुळे तो प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये मोठी छाप पाडेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Firing : राज्यात चाललंय काय? गाणी लावण्याच्या वादातून राडा; थेट कला केंद्रात गोळीबार

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात, माजी सरपंच आणि नातीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

PM Kisan Yojana: 'त्या' शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा हप्ता, कारण काय? वाचा

Vice President Election: उपराष्ट्रपती पदाच्या मतदानावेळी India आघाडीची नाही, तर BJPची मतं फुटली; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

Nepal News : महाराष्ट्रातील १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले, सर्वाधिक पर्यटक 'या' जिल्ह्यातील | VIDEO

SCROLL FOR NEXT