Post Office scheme Saam TV
बिझनेस

Post Office Scheme: कमी गुंतवणूक अन् जास्त परतावा; पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनांमध्ये गुंतवणूक करा

Post Office Scheme: प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये तुम्हाला भरघोस व्याज मिळते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करतात. आपल्या वयोवृद्ध काळात आर्थिक गरज भासू नये म्हणून योग्य वेळेतच गुंतवणूक करावी. गुंतवणूक करण्यासाठी लोक वेगवेगळ्या योजना किंवा एफडीमध्ये गुंतवणूक करतात. अनेक लोक सुरक्षेच्या दृष्टीने सरकारी योजना किंवा पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. या योजनांमध्ये गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त व्याजदर मिळते. त्याचसोबत आयकर कलम 80C अंतर्गत १.५ लाखांपर्यंत आयकर सवलत मिळते. आज आम्ही तुम्हाला अशाच योजनांची माहिती देणार आहोत. ज्यात तुम्ही कमी गुंतवणूकीत जास्त परतावा मिळवू शकता.

पोस्ट ऑफिस बचत योजना

पोस्ट ऑफिस बचत खाते उघडण्यासाठी किमान ५०० रुपयांची गुंतवणूक करावी लागते. या योजनेत तुम्हाला ४ टक्के व्याज मिळते.

टाइम डिपॉझिट

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना वेगवेगळ्या कालावधीसाठी असते. या योजनेत तुम्हाला किमान १००० रुपयांची गुंतवणूक करावी लागते. तुम्ही १ वर्ष, २ वर्षांसाठी या योजनेत गुंतवणूक करु शकता.

पाच वर्षीय रिकरिंग डिपॉझिट स्कीम

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये तुम्हाला प्रति महिना १०० रुपयांची गुंतवणूक करावी लागते. या योजनेत तुम्हाला ६.७ टक्के व्याजदर मिळते.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. सेवानिवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या कोणती अडचण येऊ नये म्हणून ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेत तुम्हाल १००० रुपये ते ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकता.

मासिक उत्पन्न खाते

मासिक उत्पन्न खात्यात तुम्हाला महिन्याला १००० रुपये गुंतवणूक करायचे असतात. एक व्यक्ती या खात्यात जास्तीत जास्त ९ लाख रुपये गुंतवू शकते. तर जॉइंट अकाउंटमध्ये १५ लाख रुपयांची गुंतवणूक करु शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: मविआत वाद? अनिल गोटे की जहागिरदार नेमका उमेदवार कोण? धुळ्यात उमेदवारीवरून पेच कायम

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT