मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी मनसेकडून ३३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
सर्व उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेत
शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीद्वारे ही निवडणूक लढवणार
मनसेच्या पहिल्या यादीत ३ अमराठी उमेदवारांना संधी
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे
मुंबई महानगर पालिकेसाठी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि भाजपपाठोपाठ आता मनसेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. रात्री उशिरा मनसेकडून ३३ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये मनसेने मुंबईतील वॉर्ड क्रमांक १० पासून सुरूवात केली. उमेदवारांना थेट एबी फॉर्म दिले जाणार अशी घोषणा राज ठाकरे यांनी सोमवारी केली होती. मनसेकडून कोणकोणत्या उमेदवारांना संधी देण्यात आली ते आपण पाहणार आहोत...
शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी युती झाली आहे. दोन्ही पक्ष युतीतून ही निवडणूक लढवणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाने आपली पहिली यादी सोमवारी सकाळी जाहीर केली. त्यानंतर रात्री उशिरा मनसेकडून देखील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. मनसेने इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देखील दिले आहेत. मनसेने आपल्या पहिल्या यादीमध्ये ३ अमराठी उमेदवारांना संधी दिली आहे. यामध्ये सोनाली देव मिश्रा, शबनम शेख आणि हरिनाक्षी मोहन चिराथ या उमेदवारांचा समावेश आहे. तर उर्वरीत सर्व उमेदवार हे मराठी आहेत.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी आता काही तास शिल्लक राहिले आहेत. मनसेने आता फक्त ३३ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. लवकरच ते उर्वरीत उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर पालिकेवर मराठी माणूस महापौर व्हावा आणि आपली सत्ता यावी यासाठी ठाकरे बंधूंनी कंबर कसली आहे. मुंबई महानगर पालिकेसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ जानेवारीला निकाल जाहीर होईल.
१ - वॉर्ड क्रमांक १० – विजय कृष्णा पाटील
२- वॉर्ड क्रमांक ११ – कविता बागुल माने
३- वॉर्ड क्रमांक १८ – सदिच्छा मोरे
४- वॉर्ड क्रमांक २० – दिनेश साळवी
५- वॉर्ड क्रमांक २१ – सोनाली देव मिश्रा
६- वॉर्ड क्रमांक २७ – आशा विष्णू चांदर
७- वॉर्ड क्रमांक ३८ – सुरेखा परब लोके
८- वॉर्ड क्रमांक ५५ – शैलेंद्र मोरे
९- वॉर्ड क्रमांक ५८ – वीरेंद्र जाधव
१०- वॉर्ड क्रमांक ६७ – कुशल सुरेश धुरी
११- वॉर्ड क्रमांक ६८ – संदेश देसाई
१२- वॉर्ड क्रमांक ८१ – शबनम शेख
१३- वॉर्ड क्रमांक ८४ – रूपाली दळवी
१४- वॉर्ड क्रमांक ९८ – दिप्ती काते
१५- वॉर्ड क्रमांक १०२ – अनंत हजारे
१६- वॉर्ड क्रमांक १०६ – सत्यवान दळवी
१७- वॉर्ड क्रमांक ११० – हरीनाक्षी मोहन चिराथ
१८- वॉर्ड क्रमांक ११५ – ज्योती अनिल राजभोज
१९- वॉर्ड क्रमांक १२९ – विजया गिते
२०- वॉर्ड क्रमांक १३३ – भाग्यश्री अविनाश जाधव
२१- वॉर्ड क्रमांक १३९ – शिरोमणी येशू जगली
२२- वॉर्ड क्रमांक १४३ – प्रांजल राणे
२३- वॉर्ड क्रमांक१५० – सविता माऊली थोरवे
२४- वॉर्ड क्रमांक १५२ – सुधांशू दुनबाळे
२५- वॉर्ड क्रमांक १८३ – पारूबाई कटके
२६- वॉर्ड क्रमांक १९२ – यशवंत किल्लेदार
२७- वॉर्ड क्रमांक १९७ – रचना साळवी
२८- वॉर्ड क्रमांक २०५ – सुप्रिया दळवी
२९- वॉर्ड क्रमांक २०७ – शलाका आरयन
३०- वॉर्ड क्रमांक २०९ – हसीना महिमकर
३१- वॉर्ड क्रमांक २१४ – मुकेश भालेराव
३२- वॉर्ड क्रमांक २१७ – निलेश शिरधनकर
३३-वॉर्ड क्रमांक २२६ – बबन महाडिक
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.