Surabhi Jayashree Jagdish
हिवाळ्यात थंडी, कोरडी हवा आणि धुळीमुळे चेहऱ्यावर चिकटपणा, मळकटपणा आणि काळसरपणा पटकन दिसू लागतो. न्यू इअर पार्टीसारख्या खास दिवशी चेहरा फ्रेश आणि ग्लोइंग दिसावा असं प्रत्येकालाच वाटतं.
पण पार्टीसाठी रेडी व्हायचं असेल तर महागडे फेशियल किंवा पार्लरची गरज नाही. घरात सहज मिळणाऱ्या साहित्याने एकच घरगुती उपाय करून तुम्ही इंस्टंट ग्लो मिळवू शकता. यासाठी हा एक फेस पॅक करेल तुमची मदत.
बेसन त्वचेवरील मळ, चिकटपणा आणि डेड स्किन काढून टाकायला मदत करतं. ते नैसर्गिक क्लिंझरप्रमाणे काम करतं आणि चेहरा उजळ दिसू लागतो. हिवाळ्यातही बेसन त्वचेला कोरडं करत नाही.
दह्यातील लॅक्टिक अॅसिड त्वचेला नैसर्गिकरित्या उजळवतं. ते त्वचेला ओलावा देऊन कोरडेपणा कमी करतं. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी दही खूप उपयुक्त आहे.
हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. ती त्वचेचा काळसरपणा कमी करून ग्लो वाढवते.
एक चमचा बेसन, एक चमचा दही आणि चिमूटभर हळद घ्या. सगळं नीट मिसळून जाडसर पेस्ट तयार करा. गरज वाटल्यास थोडंसं गुलाबपाणी घालू शकता.
हा फेसपॅक स्वच्छ चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. १० ते १५ मिनिटं सुकू द्या, पूर्ण कोरडा होऊ देऊ नका. यानंतर साध्या पाण्याने हलक्या हाताने धुवा.
फेस धुतल्यानंतर त्वचा स्वच्छ, सॉफ्ट आणि फ्रेश वाटते. चिकटपणा आणि मळकटपणा लगेच कमी झालेला जाणवतो. पार्टीसाठी नैसर्गिक इंस्टंट ग्लो मिळतो.