महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारच्या अनेक योजना असतात. सरकारच्या अनेक योजनांमध्ये महिलांना भरघोस परतावा मिळत आहे. या योजनांच्या माध्यमातून महिला स्वतः च्या पायावर उभे राहतात. सरकारने महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Sanman Saving Certificate) ही योजना सुरु केली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला भरघोस परतावा मिळेल.
या योजनेत महिला गुंतवणूक करु शकतात. या योजनेत पालक आपल्या मुलींसाठीदेखील खाते उघडू शकतात. महिलांनी आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करावी यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. ही योजना २०२३ मध्ये सुरु करण्यात आली आहे. २०२३ ते २०२५ या दोन वर्षांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेवर वार्षिक ७.५ टक्के व्याज मिळते. या योजनेवरील गुंतवणूकीवर आयकर कायदा 80C अंतर्गत सूट मिळते. परंतु योजनेअंतर्गत मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. म्हणजे व्याज उत्पन्नावर टीडीएस कापला जाईल. या योजनेतील व्याज दर तिमाहित तुमच्या अकाउंटमध्ये जमा होते.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत २ वर्षांसाठी २ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला मॅच्युरिटीनंतर २.३२ लाख रुपये मिळतील. ही योजना एफडीप्रमाणेच काम करते. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेत खाते उघडू शतचाचय तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्यासाठी फॉर्म सबमिट करा. यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, चेकसोबत पे इन स्लिप द्यावी लागेल. देशातील अनेक बँकामध्येही तुम्ही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेसाठी फॉर्म भरु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.