ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या राज्यभर लग्नसराईचे दिवस सुरु आहेत.
मग लग्नकार्य असल्यास कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची शॉपिंगची लगबग असते.
मात्र अनेकदा शॉपिगच्या नादात अनेक पैसे खर्च होतात,त्यासाठी आम्ही सांगत असलेल्या काही ट्रिक्स ठेवा लक्षात ठेवा.
लग्नकार्यासाठी कोणतीही वस्तू खरेदी करताना त्या गोष्टीच्या गुवत्तेवरुन त्या किंमतीची योग्य किंमत ठरवूनच ती वस्तू विकत करावी.
कधीही वस्तू आवडली म्हणून घेऊ नका, जर गरजेची असल्यास खरेदी करावी.
काही मार्केट काही विशेष वस्तुसाठी प्रसिद्ध असतात, अशा ठिकाणावरुन वस्तू खरेदी केल्यास किंमतीत फरक जाणवतो.
कधीही एकाच दुकानातून सगळ्या वस्तू घेऊ नये.दोन्ही दुकानात वस्तूच्या किंमतीची तुलना करुन घ्यावी.