Tax Saving Scheme Saam Tv
बिझनेस

Tax Saving Scheme : सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा अन् लाखो रुपये टॅक्स वाचवा; जाणून घ्या सविस्तर

Government Schemes : सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा अन् लाखो रुपये टॅक्स वाचवा; जाणून घ्या सविस्तर

Satish Kengar

Tax Saving Scheme : 

केंद्र सरकारच्या वतीने अनेक योजना राबवण्यात येतात. या योजना केवळ नफाच देत नाहीत तर मध्यमवर्गाला करबचतीचे (Tax Saving) फायदेही देतात. जर तुम्ही करदाते असाल आणि रिटर्नसह कर वाचवायचा असेल तर या योजना तुमच्यासाठी आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही लाखो रुपयांचा कर वाचवू शकता.

आम्ही लहान बचत योजनांबद्दल बोलत आहोत, ज्या तुम्ही पोस्ट ऑफिसमधून उघडू शकता. लहान बचत योजनांतर्गत अल्पमुदतीपासून दीर्घ मुदतीच्या गुंतवणुका आहेत. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF), मुदत ठेव, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि सुकन्या समृद्धी (SSY) यासारख्या अनेक योजना लहान बचत योजनेंतर्गत समाविष्ट आहेत. कर बचतीसाठी EPF सारखी योजनाही आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PPF मध्ये गुंतवणुकीवर करत किती मिळणार सूट?

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही लहान बचत योजनेंतर्गत एक योजना आहे. ज्यामध्ये आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपये वाचवले जाऊ शकतात. यामध्ये वार्षिक 1.5 लाख रुपये गुंतवणुकीची कमाल रक्कम आहे, ज्यामुळे ही योजना पूर्णपणे करमुक्त आहे. PPF ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे, ज्यामध्ये किमान 15 वर्षे गुंतवणूक करता येते. या योजनेत 7.1 टक्के व्याज आहे. यामध्ये तुम्ही किमान 500 रुपये गुंतवू शकता. (Latest Marathi News)

सुकन्या समृद्धी योजना (SSY)

केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेंतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली. तुम्ही तुमच्या मुलींच्या नावाने या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकता आणि दरवर्षी लाखो रुपयांचा कर वाचवू शकता. या योजनेअंतर्गत, मुलगी 18 वर्षांची झाल्यावर गुंतवलेल्या रकमेपैकी निम्मी रक्कम काढता येते आणि ती 21 वर्षांची झाल्यावर संपूर्ण रक्कम काढता येते. या योजनेत 8 टक्के व्याज आहे.

ईपीएफ योजनेअंतर्गत कर सूट

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी किंवा पीएफ खात्यांतर्गत, कर्मचाऱ्याला दरमहा त्याच्या पगाराच्या 12 टक्के योगदान द्यावे लागते. तसेच तुमच्या पीएफ खात्यात कंपनी किंवा संस्थेद्वारे समान योगदान दिले जाते. ही योजना कर बचत अंतर्गत देखील येते, ज्यामध्ये आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जाते. या योजनेत सरकार 8.1 टक्के व्याज देते. ही योजना विशेषत: निवृत्तीसाठी पैसे जमा करते, परंतु आवश्यक असल्यास, आपण आपत्कालीन निधी म्हणून पैसे काढू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

SCROLL FOR NEXT