Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

फक्त ४१६ रूपयांत व्हाल करोडपती; पोस्टाची भन्नाट योजना कोणती? जाणून घ्या सविस्तर

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनेंचा लाभ सामान्य व्यक्ती घेतात. पीपीएफ योजनाही तितकीच भन्नाट आहे. या योजनेतून ७.१ टक्के व्याज मिळते.

Bhagyashree Kamble

  • पोस्ट ऑफिसची भन्नाट स्किम.

  • पीपीएफ अन् एससीएसएस योजनेत गुंतवा.

  • पीपीएफमध्ये गुंतवल्यास ७.१ व्याज मिळेल.

सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अधिक परतावा मिळणाऱ्या योजनेत आपण हमखास गुंतवणूक करतो. नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात फिक्स डिपॉझिट आणि आर.डीमध्ये पैसे गुंतवणूक करतात. पण पोस्ट ऑफिसच्याही अशा काही योजना आहेत, जे भन्नाट आहेत. सरकारतर्फे पोस्ट ऑफिसमार्फत पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, SCSS यांसारख्या अनेक योजना राबवल्या जातात. जर आपल्याला योजनेतून उत्तम परतावा हवा असेल तर, पीपीएफ योजनेत गुंतवणूक करा.

आज आपण अशा एका गुंतवणुकीच्या पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यात अतिशय कमी रकमेची बचत करून कोट्यवधी रूपये मिळवू शकता. तसेच निवृत्तीनंतर पेंशनप्रमाणे उत्पन्नही मिळवू शकता. यासाठी आपल्याला दोन योजनांमध्ये पर्यायाने गुंतवणूक करावी लागेल. PPF आणि SCSS.

PPF

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ. ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे. या योजनेतून ७.१ टक्के व्याज मिळते. या योजनेची मुदत १५ वर्षांची असते. मात्र, इच्छेनुसार, आपल्याला ५ वर्षांनी वाढवता येईल. ही योजना पूर्णपणे करमुक्त आहे.

दररोज ४१६ रूपयांची बचत

PPF या योजनेत आपण महिन्याला १२,५०० किंवा दररोज फक्त ४१६ रूपये इतकी बचत करू शकता. PPF अकाऊंटमध्ये थेट जमा करू शकता. ही रक्कम आपली पूर्णपणे करमुक्त असेल. या योजनेत आपल्याला ७.१ टक्के व्याज मिळेल.

१५ वर्षानंतर- तुमची एकूण गुंतवलेली रक्कम ४१.३५ लाख होईल. (२२.५० लाख रूपयांची गुंतवणूक + १८.८५ लाख रूपयांचे व्याज).

२० वर्षानंतर - २० वर्षांसाठी ४१६ रूपयांची गुंतवणूक केली. तर, मॅच्युरिटीनंतर ६७.६९ लाख रूपये मिळतील. (३० लाख रूपयांची गुंतवणूक + ३७.६९ लाख रूपये व्याज).

२५ वर्षानंतर - २५ वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास आपल्याला १.०३ कोटी रूपये मिळतील. (३७.५० लाख रूपयांची गुंतवणूक + ६५.५० लाख रूपये व्याज).

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon News: वाळूमाफियांची मुजोरी! तलाठ्यावर प्राणघातक हल्ला,ट्रॅक्टरवरून खेचत चाकाखाली टाकण्याचा प्रयत्न

Maharashtra Politics: राज ठाकरे तिसऱ्यांदा मातोश्रीवर, युतीच्या मुहूर्तासाठी डिनर डिप्लोमसी?

Monday Horoscope : आयुष्याला नवीन दिशा, नवे मार्ग सापडणार; 5 राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Maharashtra Live News Update: उत्तर पुण्यात बिबट्यांचा कहर! ८०० बिबटे मोकाट, वनविभागाचे पिंजरे अपुरे

Crime : प्रेमानंद महाराजांना भेटण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार, आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून धमकावले अन्...

SCROLL FOR NEXT