PPF Saam Tv
बिझनेस

PPF Scheme: वर्षाला १.५ लाख गुंतवा अन् १ कोटी रुपये मिळवा, सरकारच्या या योजनेत कोणत्याही रिस्कशिवाय भरघोस परतावा

PPF Scheme: सरकारच्या पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला भरघोस परतावा मिळणार आहे. या योजनेत गुंतवणूकीवर तुम्हाला ७.१ टक्के व्याजदर मिळते.

Siddhi Hande

अनेकजण आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. या योजनांमध्ये गुंतवणूक करुन कमी कालावधीत तुम्ही करोडपती बनू शकतात. सरकारच्या पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूक करुन तुम्हाला चांगला फायदा होणार आहे.

पीपीएफ योजनेत तुम्हाला कलम 80C अंतर्गत १.५ लाखांच्या गुंतवणूकीवर कर सवलत मिळते. या योजनेत मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षांचा आहे. तुम्ही या योजनेत मॅच्युरिटी पीरियड ५-५ वर्षांनी वाढवू शकतात. तुम्ही २५ वर्षांसाठी गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. ६ वर्ष पूर्ण झाल्यांतर तुम्ही या योजनेतील पैसे आप्तकालीन परिस्थिती विड्रॉल करु शकतात. (PPF Scheme)

जर कोणत्या व्यक्तीने पीपीएफ अकाउंट उघडले तर तो ५०० रुपयांपासून ते १.५ लाखांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत जर तुम्ही एका वर्षासाठी गुंतवणूक केली नाही तर तुमचे अकाउंट इनअॅक्टिव्ह होऊ शकते.

पीपीएफ योजनेअंतर्गत तुम्हाला ७.१ टक्के व्याजदर मिळते. हे व्याजदर तीन महिन्यांनी दिले जाते. ही योजना फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त व्याज देते. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवू शकतात. (PPF Scheme News)

दर तुम्ही या योजनेत १५ वर्षात २५ लाख रुपये जमा करायचा विचार करत असाल तर तुम्हाला वर्षाला १ लाख रुपयांची बचत करावी लागेल. या योजनेत तुम्हाला ७.१ टक्के व्याज मिळणार आहे. त्यामुळे १५ वर्षानंतर २७ लाख १२१३९ रुपये तुम्हाला मिळणार आहेत.

जर या योजनेत तुम्ही वर्षाला १.५ किंवा १ लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्ही ५-५ वर्षांचा मॅच्युरिटी पीरियड वाढवला तर २५ वर्षानंतर तुमच्याकडे १,०३,०८,०१५ रुपये जमा असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: या ६ राशींचं श्री गणेश करतील कल्याण; सोमवार ठरेल आनंदाचा दिवस

Maharashtra Live News Update : पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री

ZP Election : जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर? आरक्षणाच्या सुनावणीचा निवडणुकीला फटका? VIDEO

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींच्या मागे नको त्या कटकटी मागे लागण्याची शक्यता, वाचा राशीभविष्य

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या की हत्या? लग्नाच्या 10 महिन्यात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT