LPG Cylinder Price, Central Government decided to reduce LPG Price Saam Tv
बिझनेस

LPG Cylinder Price : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, महिलादिनी PM मोदींची मोठी घोषणा

Central Government decided to reduce LPG Price : महिलादिनानिमित्त केंद्र सरकराने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात केली आहे. महिला दिनानिमित्त एलपीजी सिलिंडरच्या दरात आम्ही 100 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोमल दामुद्रे

LPG Price Reduce :

महिलादिनानिमित्त केंद्र सरकाराने महिलांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. घरगुती सिलिंडरवर १०० रुपयांनी कपात करण्यात आले आहे. याबाबतची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

महिला दिनानिमित्त एलपीजी सिलिंडरच्या दरात आम्ही 100 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईलच, शिवाय कोट्यवधी कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्यही सुधारेल, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं याहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात करण्याची घोषणा केली. यामुळे महागाईने पिचलेल्या जनेतला काही प्रमाणात दिलासा मिळेल. २०२४ मध्ये निवडणुका असल्यामुळे सिलिंडरच्या दरात मोठी कपात होण्याची शक्यता होती. अशातच केंद्र सरकारने १०० रुपयांनी सिलिंडरच्या दरात कपात केली आहे.

1. किती रुपयांना मिळणार घरगुती सिलिंडर ?

दिल्लीमध्ये सबसिडी न घेतलेल्या १४ किलो घरगुती सिलिंडरची किंमत ९०३ रुपये, कोलकातामध्ये ९२९ रुपये (Price) आहे. परंतु केंद्र सरकारने घोषीत केल्यानंतर दिल्लीत ८०३ रुपये तर कोलकातामध्ये ८२९ रुपयांना घरगुती सिलिंडर (Cylinder) मिळणार आहे.

मुंबईत (Mumbai) ९०२. ५० रुपयांऐवजी ८०२.५० रुपयांना तर चेन्नईमध्ये ९१८.५० रुपयांऐवजी ८१८.५० रुपयांना मिळेल. यापूर्वी घरगुती सिलिंडरच्या किमती ३० ऑगस्ट २०२३ मध्ये बदलल्या होत्या. १ मार्च २०२३ मध्ये एलपीजीचा दर दिल्लीमध्ये ११०३ रुपये इतका होता. त्यानंतर एकाच वेळी २०० रुपयांनी स्वस्त झाले होते.

2. उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलिंडर ६०३ रुपयांना मिळणार

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना २०२४-२५ या वर्षातसुद्धा गॅस सिलिंडर हा ३०० रुपयांनी अनुदान सुरु ठेवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. सुमारे १० लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच वर्षभरात १२ सिलिंडरवर सबसिडी मिळेल. दिल्लीत सध्या एलपीजीच्या किंमती ९०३ रुपये इतकी आहे तर योजनेअंतर्गत ६०३ रुपयांना सिलिंडर उपलब्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturn Jupiter yog: 48 तासांनंतर पलटणार 'या' राशींचं नशीब; शनी-गुरु तयार करणार शतांक योग, मिळणार फक्त पैसा

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

SCROLL FOR NEXT