Instagram New Update google
बिझनेस

Instagram युजर्ससाठी खूशखबर! आवडलेल्या अन् टॅग नसलेल्या स्टोरीज होतील पुन्हा शेअर, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Instagram Latest Update: इंस्टाग्रामने युजर्ससाठी नवं फीचर आणलं असून आता टॅग नसलेल्या पब्लिक स्टोरीजही थेट रीशेअर करता येणार आहेत. “Add to your story” वापरून हे फीचर सहज वापरता येईल.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या तरुणांमध्ये फेसबुकपेक्षा इंस्टाग्राम वापरण्याकडे जास्त कल आहे. इंस्टाग्राममध्ये तुम्हाला हवं तितकं मनोरंजन, दैनंदिन घडामोडी, नवनवीन ट्रेंड, व्हायरल व्हिडीओ, गाणी पाहता येतात. शिवाय तुम्हीही निशुल्कपणे तयार करू शकता. यातच एक मोठी बातमी आली आहे. इंस्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी एक फायदेशीर आणि व्हायरल फीचर सुरू केले आहे.

आता कोणत्याही व्यक्तीने तुम्हाला स्टोरीमध्ये टॅग केले नसले तरी तुम्ही ती स्टोरी सहजपणे आपल्या अकाऊंटवर रीशेअर करू शकता. यापूर्वी जर कुणी टॅग करायला विसरले तर ती स्टोरी शेअर करण्याचा कोणताही मार्ग नसायचा. त्यासाठी मूळ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने टॅग करणे आवश्यक असे. आता ही अडचण दूर झाली आहे.

जर तुम्हाला एखादी मजेशीर किंवा भावनिक स्टोरी एखाद्या सार्वजनिक अकाऊंटवर दिसली तर यापूर्वी ती शेअर करण्याचा मार्ग स्क्रीनशॉट घेणे हा एकमेव उपाय होता. मात्र आता युजर्स त्या स्टोरीज रीशेअर करू शकतात. हे फीचर इंस्टाग्रामने यावर्षीच्या सुरुवातीला आणलेल्या 'रीपोस्ट रील्स' फीचरप्रमाणेच कार्य करतं, ज्यात मूळ क्रिएटरला क्रेडिट दिलं जातं.

पब्लिक अकाऊंटवरील स्टोरी रीशेअर करण्यासाठी इंस्टाग्राम अॅप उघडून हवी असणारी स्टोरीवर टॅप केल्यानंतर मेसेज बॉक्सजवळ दिसणाऱ्या शेअर पर्यायावर टॅप करायचं आणि ‘Add to your story’ निवडायचं. त्यानंतर ती स्टोरी तुमच्या अकाऊंटवर दिसेल आणि इंस्टाग्राम मूळ पोस्ट करणाऱ्याचे क्रेडिट आपोआप दाखवेल. हे अपडेट iOS आणि Android दोन्ही युजर्ससाठी जागतिक स्तरावर रोलआऊट करण्यात येत आहे. अनेकांच्या अॅपमध्ये हे फीचर आधीच लाईव्ह झाले आहे. जे युजर्स अजूनही हे फीचर पाहू शकत नाहीत त्यांना काही वेळात ते मिळण्याची शक्यता आहे.

जर पब्लिक अकाऊंटवरील स्टोरी इतरांनी रीशेअर होऊ नये असे वाटत असेल तर अकाऊंटमध्ये बदल करून हे फीचर बंद करता येते. त्यासाठी Instagram अॅपमधील Settings & Activity मध्ये जाऊन Privacy निवडायचे आणि त्यानंतर Story पर्यायामध्ये जाऊन "Allow sharing to story" हे ऑप्शन ऑफ करायचे. हे फीचर बंद केल्यावर तुमच्या स्टोरीज कोणीही रीशेअर करू शकणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये बिबट्याचा हल्ल्यात सात जण जखमी

RBI: कर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, EMI लवकरच कमी होणार; RBI ने बँकांना दिले महत्वाचे आदेश

शेतातून उचललं, चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, ओरडताच गुप्तांगात रॉड घुसवला; पीडिता रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध

Pune : अवघे पुणे वाचनात दंग, "शांतता... पुणेकर वाचत आहेत", उपक्रमात ७.५ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा सहभाग

Railway News : 103 वर्षांचा पूल पाडणार, रविवारी ११ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक, इंटरसिटीसह या ट्रेन्सवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT