Sakshi Sunil Jadhav
सकाळच्या नाश्त्याला रोज पोहे, उपमा, शिरा, इडल्यांसारखे पदार्थ बनवणं कठीण होतं. तुम्ही अशा वेळेस उरलेल्या चपात्यांवर नजर टाकता.
सकाळच्या नाश्त्यात काही घरांमध्ये लोक आवडीने शिळी पोळी खातात. याने पोट काही काळ भरलेलं राहतं. पण काही लोक नाश्त्यात प्रोटीन युक्त पदार्थ खाण्याचा हट्ट करतात.
अनेकांना वाटतं की, चपातीमध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप कमी असते. मात्र हा गैरसमज आहे. उलट शिळ्या चपातीमध्ये फायबर, व्हिटॅमिन बी, आयरन आणि प्रोबायोटिक्स असतात. जे पचनासाठी खूप फायदेशीर असतात.
तज्ज्ञांच्या मते, सकाळच्या नाश्त्यात चपाती खाल्याने शरीराला जबरदस्त फायदे मिळतात. पुढे आपण त्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
शिळ्या चपात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. त्याने पचनसंस्था मजबूत होते. त्यामुळे गॅस, बद्धकोष्ठतेच्या त्रासाला सामोरे जाणे टळू शकते.
जर तुम्ही डायबेटीजच्या पेशेंटला शिळी चपाती दिली तर त्याच्यासाठी हा बेस्ट नाश्ता असेल. कारण त्याने तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रणात येते.
शिळ्या पोळीने पोट बराच वेळ भरलेलं राहतं. सतत खाण्याची इच्छा कमी होते आणि वजन कमी होण्यासाठी इतर प्रयत्न करावे लागत नाहीत.
जर तुम्ही नाश्त्याला शिळी चपाची खात असाल तर याचा फायदा तुमच्या हार्टला होत असतो. याने ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि बीपी कंट्रोलमध्ये राहतो.