Whatsapp new Feature Saam Digital
बिझनेस

Whatsapp new Feature: आता Google Meet, Zoom वर अवलंबून राहण्याची गरज नाही; व्हॉट्सॲपवरही असतील इंस्टाग्रामचे फिचर

Whatsapp new Feature News: अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, WhatsApp ने Instagram वर येणारे व्हिडिओ कॉल स्क्रीन शेअर फीचरचे आणले आहेत. व्हॉट्सॲपमध्ये या फीचरची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. व्हिडिओ कॉल स्क्रीन शेअर फीचरमध्ये तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन व्हिडिओ कॉलिंगदरम्यान समोरच्या व्यक्तीसोबत शेअर करू शकाल.

Sandeep Gawade

Whatsapp new Feature

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, WhatsApp ने Instagram वर येणारे व्हिडिओ कॉल स्क्रीन शेअर फीचरचे आणले आहेत. व्हॉट्सॲपमध्ये या फीचरची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. व्हिडिओ कॉल स्क्रीन शेअर फीचरमध्ये तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन व्हिडिओ कॉलिंगदरम्यान समोरच्या व्यक्तीसोबत शेअर करू शकाल. व्हॉट्सॲपचे हे फीचर आल्यानंतर ऑफिसच्या मीटिंग आणि प्रियजनांशी बोलण्याच्या पद्धतीत खूप बदल होणार आहेत.

सर्व प्रथम तुमचे व्हॉट्सॲप उघडा. यानंतर, डाउन ड्रॉपवर जा आणि उपलब्ध टॅबवर टॅप करा. आता येथे कॅमेरा स्विचचा पर्याय उपलब्ध असेल. त्यावर क्लिक केल्यानंतर स्क्रीन शेअर फीचर आयकॉन दिसेल, जिथे तुम्हाला टॅप करावे लागेल.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आता तुमच्या समोर एक पॉप-अप दिसेल, जो तुम्हाला चेतावणी देईल की तुमचा फोन कास्ट केला जात आहे. आता स्क्रीन शेअर करण्यासाठी Start Now वर टॅप करा. फीचर एक्टिवेट झालं आहे, याची पुष्टी करण्यासाठी एक मेसेज दिसेल, Youre sharing your screen. हे स्क्रीन शेअरिंग फीचर काय करेल याबद्दल तुम्हाला काही संभ्रम असेलच. तर हे फीचर Google Meet आणि Zoom मध्ये दिलेल्या स्क्रीन शेअरप्रमाणे काम करेल. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या सोयीनुसार व्हिडिओ कॉल दरम्यान कनेक्ट केलेल्या व्यक्तीला तुमच्या फोनमध्ये असलेल्या गोष्टी दाखवू शकाल.

या फिचरमुळे, Google Meet आणि Zoom कॉलवरील तुमचे अवलंबित्व संपेल. तसेच, तुम्हाला मिटींग सुरू करण्यापूर्वी शेड्यूल करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप कॉल करून तुमच्या फोनवर व्हॉट्सॲप स्क्रीन शेअर फिचरच्या मदतीने लगेच मीटिंग करू शकता आणि डेटा शेअर करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT