बिझनेस

Instagram Live Update: इन्स्टाग्राम लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी नवे नियम, नव्या युजर्ससाठी मोठा फटका

New Rules On Instagram: इन्स्टाग्राम हा दररोज कोट्यवधी लोक वापरत असलेला लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. कंपनीने आता त्यांच्या एका प्रमुख फीचरमध्ये मोठा बदल करत वापरकर्त्यांवर थेट परिणाम केला आहे.

Dhanshri Shintre

  • इंस्टाग्रामने लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी किमान १००० फॉलोअर्सची अट लागू केली आहे.

  • कमी फॉलोअर्स असलेल्या नवीन युजर्ससाठी हा मोठा फटका आहे.

  • कंपनीने याबाबत अधिकृत कारण स्पष्ट केले नसले तरी, सुरक्षितता आणि बनावट खात्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

  • इंस्टाग्रामने यापूर्वी तरुण युजर्ससाठी डीएम सुरक्षा अपडेट्स लागू केले आहेत.

इन्स्टाग्राम हे एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून दररोज कोट्यवधी लोक ते रील्स तयार करण्यासाठी आणि पाहण्यासाठी वापरतात. कंपनी वेळोवेळी यूजर्सचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी प्लॅटफॉर्ममध्ये नवनवीन बदल करत असते. अशाच एका मोठ्या बदलाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे, ज्याचा थेट परिणाम लाखो इन्स्टाग्राम यूजर्सवर होणार आहे.

इन्स्टाग्रामने त्यांच्या लाईव्ह स्ट्रीमिंग फीचरमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. आता फक्त तेच यूजर्स इन्स्टाग्रामवर लाईव्ह जाऊ शकतील ज्यांचे किमान १००० फॉलोअर्स आहेत. यामुळे नुकतेच अकाउंट तयार करणाऱ्या किंवा कमी फॉलोअर्स असलेल्या युजर्ससाठी थोडा अडथळा निर्माण होणार आहे. सध्या कंपनीने हा निर्णय का घेतला याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही, परंतु सुरक्षितता आणि दर्जेदार कंटेंट याला प्राधान्य देण्यासाठी हा बदल असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इन्स्टाग्रामने नवीन फीचर

इन्स्टाग्रामने याआधीही तरुण यूजर्सच्या सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत. अलीकडेच, कंपनीने डीएम (डायरेक्ट मेसेज) साठी दोन नवे फीचर्स सादर केले आहेत, ज्यात तरुण मुलांना चॅट सुरू करण्यापूर्वी सुरक्षा सूचना दिल्या जातील. जर एखादा तरुण व्यक्ती कोणाशी चॅटिंग करत असेल आणि दोघेही एकमेकांना फॉलो करत असतील, तर चॅटिंग सुरू करण्यापूर्वी त्याला दुसऱ्या व्यक्तीच्या प्रोफाइलची तपासणी करण्याचा सल्ला दिला जाईल.

याशिवाय, चॅटिंग दरम्यान आपली वैयक्तिक माहिती शेअर करताना सतर्क राहण्याचा सल्ला दिला जाईल. चॅटमध्ये समोरच्याने अकाउंट कधी तयार केले आहे हे देखील दिसेल, त्यामुळे बनावट अकाउंट्स सहज ओळखता येणार आहेत. इन्स्टाग्रामने हे पाऊल तरुण युजर्सची सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि प्लॅटफॉर्मवरील बनावट खात्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उचलले आहे. कंपनीने घेतलेला हा निर्णय अनेक युजर्ससाठी महत्त्वाचा ठरणार असून सुरक्षित आणि दर्जेदार अनुभव देण्याच्या दिशेने इन्स्टाग्रामचे हे एक पाऊल मानले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडा, मग पोलिसांना द्या: अमित ठाकरे

JK Encounter: पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ६ चकमकी, २१ दहशतवाद्यांना कंठस्नान

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; पीडितेच्या साडीवरील स्पर्म मुख्य पुरावा|VIDEO

Borivali News: तलावात आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, माजी खासदाराचे पालिका प्रशासनावर गंभीर आरोप

Maharashtra Live News Update: जितेंद्र आव्हाडांना मारण्यासाठी गोट्या गित्तेची मुंबईत रेकी

SCROLL FOR NEXT