Dhanshri Shintre
WAbetainfo ही वेबसाइट व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचर्सबाबत नियमित अपडेट देते. सध्या ती अनेक आगामी फीचर्सची माहिती आपल्या पोर्टलवर शेअर करत आहे.
व्हॉट्सअॅपचे काही फीचर्स सध्या बीटा टप्प्यात चाचणीसाठी उपलब्ध आहेत, तर इतर काही फीचर्स अजूनही डेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत आहेत.
काही बीटा युजर्ससाठी नवीन फीचर टेस्ट होत आहे, ज्यात ग्रुपमध्ये किती सदस्य एकाचवेळी टाइप करत आहेत हे पाहता येणार आहे.
काही बीटा युजर्ससाठी फेसबुक व इंस्टाग्रामवरून थेट प्रोफाइल फोटो आयात करण्याचे नवीन फीचर टेस्टिंग टप्प्यात आणले जात आहे.
व्हॉट्सअॅप एक नवीन फीचर विकसित करत आहे, ज्याद्वारे युजर्स चॅनेलवर स्टेटस अपडेट्स आणि प्रश्न थेट शेअर करू शकतील.
व्हॉट्सअॅपने काही बीटा युजर्ससाठी एक नवीन फीचर आणले आहे, ज्याद्वारे अधिकृत ग्राहक सेवेशी थेट आणि सोप्या पद्धतीने चॅट करता येणार आहे.
व्हॉट्सअॅप नवीन फीचर विकसित करत आहे, ज्याद्वारे युजर्स व्हिडिओ आणि व्हॉइस कॉलदरम्यान इमोजीचा वापर करून आपली प्रतिक्रिया व्यक्त करू शकतील.
व्हॉट्सअॅप एक नवीन फीचर आणत आहे, ज्यामध्ये GIF कीबोर्ड लेआउटमध्ये दोनऐवजी तीन कॉलम दिसतील, त्यामुळे अधिक GIF एकाचवेळी पाहता येतील.