Inspiration Saam Tv
बिझनेस

Inspiration: 'भाड मै जाये ये नोकरी...' १४ वर्षांचा अनुभवानंतरही नोकरी मिळेना, ५ महिने वणवण केली, आता सुरू केला स्वत:चा व्यवसाय

Inspirational Story: कमलेश कामतेकर यांच्याकडे १४ वर्षांचा अनुभव असूनही त्यांना नोकरी मिळत नव्हती. त्यानंतर त्यांनी एक निर्णय घेतला आणि स्वतः चा व्यवसाय सुरु केला आहे. ते आता रिक्षा चालक म्हणून काम करतात.

Siddhi Hande

प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी करायचे असते. काहींना स्वतः चा व्यवसाय सुरु करायचा असतो तर काही लोकांना चांगल्या पगाराची नोकरी करायची असते. परंतु अनेकदा आयुष्याला असं वळण येतं की, सर्वकाही संपल्यासारख वाटतं. परंतु कितीही काही झालं तरीही परिस्थितीवर मात करुन जो व्यक्ती प्रयत्न करतो तो नक्कीच यशस्वी होतो. असंच काहीसं कमलेश कामतेकर याच्यासोबत झालं. (Success Story)

कमलेश कामतेकर हे मुंबईत राहतात. त्यांना १४ वर्षांचा ग्राफिक डिझायनिंगमध्ये अनुभव आहे. एवढा अनुभव असूनही कमलेश यांना कामावरुन काढून टाकण्यात आले. कंपनीने कर्मचाऱ्यांची कपात केली त्यात कमलेश कामतेकर यांनाही काढून टाकण्यात आले. त्यानंतर कमलेश यांनी नवीन नोकरी शोधण्यासाठी खूप मेहनत केली. पाच महिने होऊनदेखील त्यांना नोकरी मिळाली नाही. त्यांनी लिक्डिंन अशा विविश साइटवर जाऊन अर्ज केले. परंतु त्यांना काही नोकरी मिळाली नाही.त्यांनी त्यांच्या आव्हानांबद्दल पोस्ट करत सांगितले आहे. (Success Story Of Graphic Designer Become Auto Driver)

कमलेश कामतेकर यांनी म्हटले की, पाच महिने होऊन गेले तरीही मला नोकरी मिळाली नाही. चौदा वर्षांचा असिस्टंट क्रिएटिव्ह मॅनेजर म्हणून अनुभव असूनही मला नोकरी मिळाली नाही. मी माझ्या मित्रांच्या मदतीने नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु नेहमी मला रिजेक्शन मिळाले. एवढा अनुभव असूनही कधीच चांगली संधी मिळाली नाही. त्यामुळे मी स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले.त्यानंतर मी ठरवले की भाड मै जाये ये नोकरी अब खुद का बिझनेस करेंगे. त्यानंतर मी डिझाइनिंग करिअर सोडून रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.

कमलेश कामतेकर यांचा हा निर्णय अनेक लोकांसाठी प्रेरणादायी आहे. अनेक लोक अपयश आल्यावर हार मानतात. पुन्हा प्रयत्न करत नाही. किंवा अनेकांना एवढा अनुभव असूनही आपण रिक्षा कशी चालवायची असं मनात आलं असेल. परंतु हे असतानाही त्यांनी मोठ्या मनाने रिक्षा चालवायचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय खूप कौतुकास्पद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

Gajkesari Rajyog: आज गुरु चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT