Infosys Work Policy Saam Tv
बिझनेस

Infosys Work Policy : आधी ७० तास काम करायचा सल्ला, आता म्हणतात ओव्हरटाइम नकोच, नारायण मूर्तींचा थेट कर्मचाऱ्यांना मेल

Narayan Murthy Infosys Work Policy: इन्फोसिसने कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता कर्मचाऱ्यांना दिवसाला फक्त ९ तास १५ मिनिटेच काम करता येणार आहे. यानंतरदेखील काम केले तर अलर्ट जारी केला जाईल.

Siddhi Hande

देशातील सर्वात मोठी आयटी कंपन्यांपैकी एक म्हणजे इन्फोसिस. इन्फोसिस कंपनी नेहमीच चर्चेत असते. कर्मचाऱ्यांना ७० तास काम करण्याचा सल्ला नारायण मूर्ती यांनी केला होता. त्यांनी आता कर्मचाऱ्यांना नवीन सल्ला दिला आहे. इन्फोसिस कंपनीने एक ऑटोमेटेड सिस्टीम लागू केली आहे. ज्यामध्ये जर कोणत्याही कर्मचाऱ्यांनी ९ तास १५ मिनटांपेक्षा जास्त वेळ काम केले तर अलर्ट जारी केले जाईल.(Infosys New Work Policy)

इन्फोसिसने मेलमध्ये काय लिहलंय? (Infosys Mail To Employees)

इन्फोसिस कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना मेल पाठवला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, आम्ही तुमच्या कामाची प्रशंसा करतो. परंतु तुमच्या भविष्यासाठी वर्क लाइफ बॅलन्स ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांनी नियमित ब्रेक घ्यावेत. मॅनेजरशी चर्चा करावेत. स्वतः ला फ्रेश ठेवण्यासाठी इतर कामे करावीत.

वेळेपेक्षा जास्त वेळ काम करु नये (Do Not Work More Than 9.15 Hours)

इन्फोसिस कंपनीने याबाबत कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर कोणत्याही कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम घेतले तर ते जास्त वेळ काम करतात. यावेळी कामाचे तास ट्रॅक केले जातात. याचा रिपोर्ट एचआरकडे जातो. त्यानंतर एचआर कर्मचाऱ्यांना मेल पाठवते. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास आणि ऑफिस न जाण्याचे दिवस मोजले जातात.

महिन्यातून १० दिवस ऑफिसला जाणे अनिवार्य

इन्फोसिसने नोव्हेंबर २०२३ मध्ये नवीन वर्कप्लेस पॉलिसी लागू केली होती. याअंतर्गत कर्मचाऱ्यांना दर महिन्याला कमीत कमी १० दिवस ऑफिसला येणे अनिवार्य आहे. जर इतर दिवशी रिमोट वर्क करत असतील आणि ९.१५ तासांपेक्षा जास्त वेळ ऑनलाइन असतील तर एचआर नोटीस पाठवू शकते.

याआधी ७० तास काम करण्याचा सल्ला

याआधी इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता इन्फोसिसने कर्मचाऱ्यांच्या वर्क लाइफ बॅलन्ससाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त ९.१५ तास काम करावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भाजप प्रवेशानंतर कैलास गोरंट्याल यांचं जालन्यात पहिल्यांदाच आगमन; कार्यकर्त्यांकडून स्वागत

PF Rules Payslip : कंपनीच्या पे स्लिपमध्ये PF रक्कम कमी का दिसते? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

Yashasvi Jaiswal : यशस्वी भव! ओव्हलच्या मैदानात जैस्वाल शो, इंग्लंडच्या नाकावर टिचून ठोकलं शतक

Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा झटका! बड्या नेत्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Beed News: शाळा बनली कुस्तीचा आखाडा; शिक्षक आणि क्लर्कमध्ये हाणामारी पाहा,VIDEO

SCROLL FOR NEXT