Congress: राहुल गांधींना १०० ई-मेल अन् नेत्यांवर गंभीर आरोप; काँग्रेसच्या बड्या महिला नेत्याचा राजीनामा

Congress Loses Another Leader: काँग्रेसच्या माजी महिला शहराध्यक्षा आणि राज्य महिला उपाध्यक्षा संगीता तिवारी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Congress
CongressSaam
Published On

राजकीय वर्तुळातून काँग्रेस पक्षासाठी धक्का ठरणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या माजी महिला शहराध्यक्षा आणि राज्य महिला उपाध्यक्षा संगीता तिवारी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी पक्षातील काही बड्या नेत्यांवर गंभीर आरोप केले असून, काँग्रेसमधील भेदभाव त्यांनी उघडकीस आणली. यासंदर्भात त्यांनी राहुल गांधींना तब्बल १०० ई मेल पाठवले होते. मात्र कुठलीही दखल न घेतल्यामुळे पक्षाला रामराम ठोकत असल्याचं तिवारी यांनी सांगितलं.

काँग्रेसमध्ये आपल्यावर अन्याय झाल्याचा गंभीर आरोप संगीता तिवारी यांनी केला आहे. त्यांनी सांगितलं की, 'पक्षातील काही नेत्यांनी माझ्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचला', असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, या संदर्भात राहुल गांधी यांना तब्बल १०० ईमेल करूनही कुठलीही दखल घेतली गेली नाही, अशी तक्रारही त्यांनी यावेळी केली.

Congress
Monsoon Update: पुण्यात अवकाळी पावसाच्या सुखद सरी, आणखी 'इतके' दिवस पाऊस पडणार; नागरिकांना दिलासा

लवकरच महायुतीकडे वळण्याची शक्यता

संगीता तिवारी यांनी लवकरच आपण काँग्रेसला सोडचिट्टी देणार असल्याचे सांगितले आहे. "दोन पक्षांकडून मला ऑफर आल्या आहेत आणि लवकरच मी महायुतीतील एखाद्या पक्षात प्रवेश करणार आहे." त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Congress
Pune: शर्ट काढून धिंगाणा अन् पोलिसांवर हात उगारण्याचा प्रयत्न; दारूड्यानं पुण्यात घातला राडा

संगीता तिवारी या पक्षातील सक्रिय महिला नेत्या होत्या. त्यांच्या आरोपांनी पक्षातील अंतर्गत वाद, भेदभाव आणि नेतृत्वाची उदासीनता पुन्हा समोर आली आहे. विशेषतः महिला आणि जातीविषयक मुद्द्यांवर काँग्रेसची भूमिका प्रश्नचिन्हात येते, हे या प्रकरणातून दिसून येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com