IndusInd Bank ₹2000 crore scam under Mumbai EOW investigation; ex-top executives face inquiry. saam tv
बिझनेस

IndusInd Bank Scam: मोठी बातमी! अकाउंट बुकमध्ये गडबड; इंडसइंड बँकेत २००० कोटींचा घोटाळा

IndusInd Bank 2000 Crore Scam: मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने (ईओडब्ल्यू) २००० कोटी रुपयांचा अकाउंटिंग घोटाळा उघडकीस आणल्यानंतर इंडसइंड बँकेला मोठा वादाचा सामना करावा लागत आहे. बँकेच्या माजी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची आर्थिक अनियमिततेबद्दल चौकशी सुरू आहे.

Bharat Jadhav

  • इंडसइंड बँकेच्या अकाउंटिंग बुकमध्ये फेरफार करून ₹२००० कोटींचा घोटाळा.

  • माजी सीएफओ, डेप्युटी सीईओ व सीईओ यांची चौकशी सुरू.

  • मुंबई पोलिसांच्या ईओडब्ल्यूकडून प्राथमिक तपास.

इंडसइंड बँकेच्या अकाउंटिंग लॅप्सच्या प्रकरणी करण्यात येणाऱ्या चौकशीत नवीन खुलासे समोर आलेत. बँकेच्या तत्कालीन उच्च व्यवस्थापनाने त्यांच्या अकाउंटिंग बुकमध्ये फेरबदल केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात अंदाजे ₹२,००० कोटी रुपयांच्या अनियमितता झाल्याची बाब मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) केलेल्या प्राथमिक तपासात उघड झालीय. बँकेच्या तत्कालीन उच्च व्यवस्थापनाने त्यांच्या अकाउंटिंग बुकमध्ये फेरबदल केल्याचे मान्य केलंय.

गेल्या आठवड्यात ईओडब्ल्यूने बँकेचे माजी सीएफओ गोविंद जैन, माजी डेप्युटी सीईओ अरुण खुराणा आणि माजी सीईओ सुमंत कठपालिया यांचे जबाब नोंदवण्यात आले. नंतर खुराणा यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले. या प्रकरणात खुराणा यांची भूमिका महत्त्वाची आहे, कारण त्यांना बँकेच्या खात्यांमध्ये करण्यात आलेल्या बदलांची आणि समायोजनांची माहिती होती. नंतर खुराणा यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले.

तपासाशी परिचित असलेल्या सूत्रांचे म्हणणे आहे की खुराणा यांची भूमिका महत्त्वाची आहे, कारण त्यांना बँकेच्या खात्यांमध्ये करण्यात आलेल्या बदलांची आणि समायोजनांची माहिती होती. या समायोजनांमुळे बँकेच्या शेअर्सची किंमत कृत्रिमरित्या वाढली, असा आरोप आहे. दरम्यान त्यावेळच्या काही उच्च व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी या माहितीचा फायदा घेऊन इनसाइडर ट्रेडिंग केली. ज्यामुळे यातून त्यांनी शेकडो कोटी रुपये कमावले अशी माहिती काही सुत्रांनी दिलीय.

अनेक कर्मचारी आणि माजी अधिकाऱ्यांची चौकशी केल्यानंतर बँकेच्या पुस्तकांमध्ये दोन वेगवेगळ्या शीर्षकाखाली बदल करण्यात आले होते. यामुळे शेअरच्या किमतीवर परिणाम झाल्याचं ईओडब्ल्यूला आपल्या तपासात आढळून आले. दरम्यान काही माजी अधिकाऱ्यांचा दावा आहे की ते कोणत्याही अनियमिततेत सहभागी नव्हते.

पुढील पावले उचलण्याबाबत ईओडब्ल्यू लवकरच कायदेशीर अधिकारी आणि आर्थिक तज्ज्ञांकडून सल्ला घेईल. हे प्रकरण अनेक बाबतीत सत्यम घोटाळ्यासारखेच आहे, असं तपासात सहभागी असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

इंडसइंड बँकेला प्रथम त्यांच्या डेरिव्हेटिव्ह्ज पोर्टफोलिओमध्ये ही अकाउंटिंग लॅप्स आढळली. परंतु नंतर ती त्यांच्या मायक्रोफायनान्स व्यवसायात पसरली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, सीईओ सुमंत कठपालिया आणि डेप्युटी सीईओ अरुण खुराणा यांनी एप्रिल २०२५ मध्ये राजीनामा दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan : साहिबजादा फरहानचा माज उतरला; विकेट पडताच संतापला...पाहा व्हिडिओ

Akola Flood: दु:ख कोणाला सांगयचं! बैलजोडीसह गाडी पुरात बुडाली; शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत 'नंदी राजा'चा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा हाहाकार; जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर|VIDEO

IND Vs Pak : पाकिस्तानच्या कॅप्टनला सूर्याने पुन्हा केलं इग्नोर, रवी शास्त्रींनीही बोलणं टाळलं; VIDEO

Jalgaon Politics : माजी महापौराच्या फॉर्म हाऊसवर भलतेच उद्योग; पोलिसांकडून मोठी कारवाई, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT