हवाई प्रवासाच्या तिकिटांवर 'क्युट चार्ज' लावला जाऊ शकतो? असा प्रश्न कसा केला ? असा प्रश्न का विचारला गेला, असा हा विचार आला असेल. पण असं घडलंय, इंडिगो एअरलाइन्सच्या तिकिटांमध्ये अनेक विचित्र शुल्क आकारले गेल्याची घटना समोर आली असून एका प्रवाशाने सोशल मीडियावर त्याचा अनुभव शेअर केलाय. दरम्यान तिकिटावर असा चार्ज लावण्यात आल्याचं पहिल्यांदाच ऐकायला आणि बघितलं असेल ना? विमान कंपनीचा प्रकार समोर आल्यानंतर मोठी खळबळ माजलीय.
काय आहे क्युट चार्ज
एका वकिलाने लखनौ ते बेंगळुरूसाठी इंडिगो फ्लाइटचे तिकीट बुक केलं. तिकिटाच्या बिलमध्ये "गोंडस शुल्क" आकारण्यात आल्याचं पाहून ते आश्चर्यचकित झाले. त्यानंतर तिकीट बुक करणाऱ्या वकिलाने इंडिगो एअरलाइन्सला “क्युट फी” बद्दल प्रश्न केला. त्यांनी गंमतीने विचारले की, हे शुल्क प्रवाशांच्या ‘क्युटनेस’साठी आकारले जात आहे की विमानाच्या ‘क्युटनेस’साठी? ही मजेशीर आणि रंजक घटना सोशल मीडियावर खूप चर्चेत आलीय. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. इंडिगोने स्पष्ट केले की, विमानतळावर वापरल्या जाणाऱ्या उपकरणांसाठी “क्यूट फी” आकारली जाते.
दरम्यान सोशल मीडियावर ही पोस्ट खूप व्हायरल झालीय. 1.7 दशलक्षाहून अधिक वेळा ही पोस्ट पाहिली गेलीय. या पोस्टवर इतर लोकांच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळाल्या आहेत. कोणीतरी म्हणाले, "आता मला समजले की इंडिगो मला तिप्पट किंमत का सांगत होते. कदाचित गोंडस असणे देखील आता गुन्हा असावा!"
यावर इंडिगो एअरलाइनने याबाबत स्पष्ट केले की "CUTE फी" म्हणजे "कॉमन युजर टर्मिनल इक्विपमेंट" फी असते, जे मेटल डिटेक्टर, एस्केलेटर आणि विमानतळावर वापरल्या जाणाऱ्या इतर उपकरणांच्या वापरासाठी आकारले जातं. दरम्यान या वकिलाने “यूजर डेव्हलपमेंट फी” आणि “एव्हिएशन सिक्युरिटी फी” बद्दल देखील विचारले. हे शुल्क, सरकारला भरलेल्या करांव्यतिरिक्त प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे का? असा प्रश्न त्यांनी केला. यावर इंडिगोने सांगितले की, विमानतळाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि देखभालीसाठी “वापरकर्ता विकास शुल्क” आकारले जाते. तर विमानतळ चालकांसाठी “एव्हिएशन सुरक्षा शुल्क” आकारले जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.