देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन १७ जानेवारीला सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन
कोलकाता – गुवाहाटी दरम्यान धावणार ही ट्रेन
पंतप्रधान मोदी १७ जानेवारी रोजी पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे उद्घाटन करतील. तसेच नवीन सहा अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांचेही अनावरण करतील. कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या लाँचिंगसोबतच सहा नवीन अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन देखील सुरू केल्या जात आहे. या रेल्वेची प्रवासी सेवा १७ आणि १८ जानेवारीपासून सुरू होतील. दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेनचा ताशी १८० चा स्पीड आहे. या स्पीडचा एक व्हिडिओ स्वत: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव सोशल मीडियावर शेअर केला होता.
कोलकाता-गुवाहाटी मार्गावरील वंदे भारत स्लीपर ट्रेनचे भाडे २,३०० रुपयांपासून सुरू होईल. कोलकाता ते गुवाहाटी, एसी ३-टायरचे भाडे २,३०० रुपये, एसी २-टायरचे भाडे ३,००० आणि एसी १-टायरचे भाडे ३,६०० असेन. दरम्यान पंतप्रधान मोदी १७ जानेवारी रोजी पश्चिम बंगालमधील मालदा टाउन येथून देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. ही ट्रेन कामाख्या आणि हावडा जंक्शन दरम्यान आठवड्यातील सहा दिवस धावेल. दुसरीकडे प्रवाशांसाठी ६ नवीन अमृत भारत एक्सप्रेस देखील सुरू केल्या जात आहेत.
16107/16108 ताम्बरम ते संतरागाछी
16597/16598- सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया टर्मिनल बेंगळुरू ते अलीपुरद्वार जंक्शन
16523/16524- सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया टर्मिनल बेंगळुरू ते बालुरघाट
16223/16224- सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया टर्मिनल बेंगळुरू ते राधिकापूर
20603/20604- न्यू जलपाईगुडी ते नागरकोइल
20609/20610- न्यू जलपाईगुडी ते तिरुचिरापल्ली
२०२६ मध्ये भारतीय रेल्वेमध्ये अनेक मोठ्या सुधारणा होणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून नवीन पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव दिलीय. ते दिल्ली येथे आयोजित अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार समारंभात बोलत होते. या वर्षी ५२ आठवड्यात ५२ सुधारणा आणल्या जातील, ज्यामुळे येत्या काळात भारतीय रेल्वेला एक नवीन रूप मिळणार आहे. ट्रेनमध्ये तंत्रज्ञान आणि नवोपक्रमासाठी एक नवीन संरचनात्मक दृष्टिकोन आणला जाईल. यात एआयचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार असल्याची माहिती सुद्धा रेल्वे मंत्र्यांनी दिलीय.
या ट्रेनमध्ये १६ कोच असतील त्यात एसी ३ टियरचे ११ कोच, एसी २ टियरचे ४ कोच, एसी फर्स्टचा एक कोच असणार आहे. या ट्रेनमधून ८२३ व्यक्ती प्रवास करु शकतील. त्यात एसी ३ टियरमध्ये ६११, एसी २ टियरमध्ये १८८ तर एसी 1st मधून २४ जण प्रवास करु शकतील.
प्रत्येक बर्थच्या बाजूला पॅड फीचर असेन. तसेच राजधानी एक्सप्रेस गाड्यांच्या तुलनेत बर्थ मॅट्रेस अधिक आरामदायी असतील. वंदे भारतमधील स्लीपर इंटीरिअर अधिक चांगले करण्यात आलंय. या ट्रेनमध्ये अपर आणि मिडल बर्थपर्यंत जाण्यासाठी जिना अधिक चांगला करण्यात आलाय. ज्येष्ठ व्यक्तींना अपर आणि मिडल बर्थपर्यंत सहज जाता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.