Forbes Most Powerful Indian Women  Saam Tv
बिझनेस

Most Powerful women: भारतीय महिलांचा जगात दबदबा; फोर्ब्सकडून जगातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी जाहीर

Bharat Jadhav

World Most Powerful Indian Women In Forbes List :

फोर्ब्सकडून जगातील शक्तीशाली महिलांची यादी जाहीर करण्यात आलीय. यात भारतीय महिलांचा जगात दबदबा पाहण्यास मिळत आहे. जागतिक व्यापार जगातही भारतीय महिलांना उच्च स्थान मिळवलं आहे. बिझनेस मॅगझिन फोर्ब्सने जगातील सर्वात शक्तिशाली महिलांची वार्षिक यादी जाहीर केलीय. यात भारतातील चार महिलांचा समावेश आहे. (Latest News)

या फोर्ब्सची यादी पैसे, मीडिया, प्रभाव आदी गोष्टींच्या आधारावरून तयार करण्यात आलीय. यात भारतीय महिलांनी आपला दबदबा दाखवलाय. या चार महिलांमध्ये कोणत्या भारतीय महिलांचा समावेश आहे हे जाणून घेऊ.

निर्मला सीतारमण

या यादीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावाचा समावेश आहे. सीतारामन ह्याचे वय ६४ वर्ष आहे. त्यांनी २०१७ ते २०१९ या काळात २८ व्या संरक्षण मंत्री म्हणूनही काम केलं. इंदिरा गांधी यांच्यानंतर संरक्षण मंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम करणाऱ्या त्या भारतातील दुसऱ्या महिला ठरल्या. दरम्यान २०२२ मध्येही फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीतही त्यांचे नाव घेतलं होते. त्यावेळी त्यांना ३६ स्थान दिले आणि यावर्षी त्या ३२ व्या स्थानी आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रोशनी नादर मल्होत्रा

रोशनी नादर मल्होत्रा ​​एक भारतीय अब्जाधीश महिला आहेत. त्या HCLटेक्नॉलॉजीजच्या (चेअरपर्सन) अध्यक्षदेखील आहेत. HCL संस्थापक शिव नाडर यांची एकुलती एक मुलगी म्हणून, IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट (२०१९ ) नुसार, त्यांना भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून ओळखल्या जातात. फोर्ब्सने जगातील सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये ४२ वर्षीय मल्होत्रा ह्या ​​सातत्याने फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवलंय. २०१९ मध्ये त्या या यादीत ५४ व्या, २०२० मध्ये ५५ व्या आणि २०२३ मध्ये ६० व्या स्थानावर आहेत.

सोमा मंडल

सोमा मंडल या स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विद्यमान अध्यक्षा आहेत. त्यांनी जानेवारी २०२१ पासून ही जबाबदारी संभाळलीय. ही जबाबदारी घेणाऱ्या त्या प्रथम महिला असल्याचं त्यांनी इतिहास रचलाय. सोमा मंडल यांचा जन्म १९८४ मध्ये भुवनेश्वर येथे झालाय. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर डिग्री मिळवलीय. त्यांच्या कॉर्पोरेट कामगिरी व्यतिरिक्त त्या स्कोपच्या अध्यक्षपदावर आहेत. २०२३ मध्ये त्यांना ETPrime वुमन लीडरशिप अवॉर्ड्समध्ये सीईओ ऑफ द इयर' म्हणून गौरवण्यात आलंय. दरम्यान त्या फोर्ब्सच्या वार्षिक यादीत ७० व्या क्रमांकावर आहेत

किरण मजूमदार शॉ

किरण मुझुमदार-शॉ ह्या एक प्रख्यात भारतीय अब्जाधीश उद्योजोगिका आहेत. शॉ यांनी भारतात बायोकॉन लिमिटेड आणि बायोकॉन बायोलॉजिक्स लिमिटेडची स्थापना केलीय. त्यांनी त्याचं नेतृत्व केलंय. यासह त्या बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या माजी अध्यक्षादेखील होत्या.

मजुमदार शॉ यांना विज्ञान आणि रसायनशास्त्रातील योगदानाबद्दल २०१४ मध्ये ओथमार सुवर्ण पदकासह अनेक पुरस्कार मिळालेत. फोर्ब्सने २०१९ मध्ये त्यांना जागतिक स्तरावर ६८ व्या सर्वात शक्तिशाली महिला म्हणून जाहीर केलं होतं. २०२० त्यांना EY World Entrepreneur of the Year म्हणून गौरवलं होतं. या वर्षाच्या फोर्ब्सच्या यादीत त्यांना ७६ वे स्थान देण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT