Top 10 Philanthropist  Saam TV
बिझनेस

Top 10 Philanthropist : देशातील सर्वात मोठ्या दानशूरांची यादी जाहीर, गौतम अडानी पाचव्या क्रमांकावर

HCL टेक्नॉलॉजीज या आयटी कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष शिव नाडर सर्वात मोठे दानशूर ठरले आहेत.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

देशातील सर्वाधिक देणगी देणाऱ्या व्यावसायिकांची यादी आली आहे. यावर्षीच्या आर्थिक वर्षात एकूण ११९ श्रीमंतांनी एकूण ८८४५ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ही रक्कम मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ५९ टक्के अधिक आहे.

HCL टेक्नॉलॉजीज या आयटी कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष शिव नाडर सर्वात मोठे दानशूर ठरले आहेत. त्यांनी एकूण २०४२ कोटी रुपयांची देणगी दिली, जी मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ७६ टक्के अधिक होती. शिव नाडर यांनी गेल्या पाच वर्षांत तिसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

EdelGive Hurun India Philanthropy List २०२३ नुसार, देशातील १० सर्वात मोठ्या अब्जाधीशांनी २०२३ मध्ये एकूण ५८०६ कोटी रुपयांची देणगी दिली. एचसीएल टेक्नॉलॉजीचे संस्थापक शिव नाडर या यादीत पहिल्या स्थानी आहेत. २०२४ कोटी रुपयांनुसार त्यांनी दररोज ५.६ कोटी रुपये दान केले. त्यांच्यानंतर विप्रोचे मालक अझीम प्रेमजी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ज्यांनी १७७४ कोटी रुपयांची देणगी दिली. (Latest Marathi News)

अदानी-अंबानींनी किती देणगी दिली?

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी यावर्षी ३७६ कोटी रुपयांची मदत केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण आठ टक्क्यांनी कमी आहे. या यादीत ते तिसरे सर्वात दानशूर व्यक्ती राहिले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांची संपत्ती या काळात दोन टक्क्यांनी वाढून ८.०८ लाख कोटी रुपये झाली आहे. दुसरे सर्वात श्रीमंत भारतीय गौतम अदानी या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यांनी २८५ कोटी रुपयांची देणगी दिली.

भारतातील दानशूरांची यादी

  • शिव नाडर- २०४२ कोटी

  • अजीम प्रेमजी - १७७४ कोटी

  • मुकेश अंबानी - ३७६ कोटी

  • कुमार मंगलम बिरला - २८७ कोटी

  • गौतम अडानी - २८५ कोटी

  • बजाज - २६४ कोटी

  • अनिल अग्रवाल - २४१ कोटी

  • नंदन निलेकानी - १८९ कोटी

  • अदार पूनावाला - १७९ कोटी

  • रोहिणी निलेकानी - १७० कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade Facial : पार्लरला न जाता घरच्या घरीत करा हे ५ फेशियल, चेहरा दिसेल चमकदार आणि सुंदर

Municipal Elections Voting Live updates : जळगाव महानगरपालिकेत ११.३० वाजेपर्यंत १३,३९टक्के मतदान

Ilkal Saree Dress: पार्टी आणि समारंभासाठी खास इरकल साडीपासून तयार करा हे 7 सुंदर स्टाईलिश ड्रेस

Blue Ink Voting Sign: मतदानाच्या वेळी बोटाला निळी शाई का लावतात?

Bigg Boss Marathi 6 : गळा दाबला अन्...; बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीची झुंज, विशाल-ओमकार एकमेकांना भिडले, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT