Indian Railway Ticket Saam Tv
बिझनेस

Railway Ticket Rule: जनरल तिकीट काढल्यानंतर किती वेळा ट्रेन बदलू शकतो? यावर मर्यादा आहे का?

कोमल दामुद्रे

Update on Indian Railway Rules You Must Know:

भारतीय रेल्वे ही लाखो प्रवाशांचे सोयीचे साधन. अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही ट्रेनने होते. गावी जाण्यासाठी किंवा लांबचा पल्ला गाठण्यासाठी आपण ट्रेनचे तिकीट बुक करतो.

भारतीय रेल्वे एकाच ट्रेनमध्ये वेगवेगळ्या वर्गाचे डबे ठेवते जेणेकरुन लोक त्यांच्या आर्थिक सोयीनुसार त्यांचा प्रवास पूर्ण करु शकतील. पॅसेंजर ट्रेनमध्ये एसी, स्लीपर आणि जनरल असे तीन प्रकारचे डबे असतात. यापैकी जनरल कोचला अनारक्षित श्रेणी असेही म्हटले जाते. पंरतु, याचे तिकीट हे सर्वात कमी असते पण बसण्यासाठी राखीव जागा उपलब्ध नाही.

बर्‍याचदा लोक लवकर पोहचण्यासाठी एक्सप्रेस ट्रेनचे (Train) जनरल तिकीट घेतात. भारतातील मोठ्या लोकसंख्येच्या देशात बहुतेक लोक लांब अंतरावर देखील सामान्य डब्यात बसतात. अशावेळी अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, एखाद्याला एका ट्रेनच्या जनरल डब्यातून उतरुन दुसऱ्या डब्याच्या जनरल डब्यात जायचे असेल तर तो तसे करु शकतो का? बरेच लोक असे करतात. एका ट्रेनने ठराविक स्टेशनवर जातात, मग तिथे उतरतात आणि मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनमध्ये चढतात आणि पुढे जातात. असे अनेक कारणांसाठी केले जाते. जर ट्रेनध्ये गर्दी असेल तर त्याच्या सोबत असणारा साथीदार मागून येऊन त्याचासोबत प्रवास करु शकतो का?

1. असे करणे महागात पडू शकते?

जनरल तिकीटावरुन इतर कोणत्याही ट्रेनमधून प्रवास करणे महागात पडू शकते. ज्या ट्रेनमध्ये प्रवास (Travel) करत आहात त्याच ट्रेनमध्ये तुम्हाला पुढचा प्रवास करावा लागेल. जर टीटीईने तुम्हाला तिकीट मागितले आणि तुमचे तिकीट दुसऱ्या ट्रेनचे असेल तर तुमच्याकडून दंड आकारला जाऊ शकतो.

ज्या स्थानकावरून तुम्ही तिकीट खरेदी केले आहे त्या स्थानकाचे नाव आणि वेळ त्यावर नमूद केलेली असते. त्यामुळे तुम्ही कोणत्या ट्रेनचे तिकीट घेतले आहे ते कळून येते. त्यामुळे जनरल तिकिटावर ट्रेन न बदलण्याचा सल्ला दिला जातो.

2. तिकिट असले तरीही दंड आकारला जाऊ शकतो

जनरल तिकीट (Ticket) असूनही तुम्हाला स्टेशनवरच दंड होऊ शकतो. याचे कारण त्या तिकिटाची वैधता. जनरल तिकिटाचीही कालमर्यादा असते, त्यानंतर ते अवैध ठरते. तुम्ही दिल्ली-मुंबई सारख्या कोणत्याही मेट्रो सिटी स्टेशनवर जनरल तिकीट खरेदी करत असाल तर त्याची वैधता फक्त 1 तासासाठी आहे. म्हणजे तुम्हाला कोणतीही ट्रेन पकडावी लागेल आणि तेथून १ तासाच्या आत निघावे लागेल. तर दुसरीकडे, जर तुम्ही छोट्या शहरातील स्टेशनवर असाल तर तुम्हाला जनरल तिकिटावर स्टेशन सोडण्यासाठी 3 तास मिळतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

SCROLL FOR NEXT