Railway New Rule Saam Tv
बिझनेस

Railway New Rule: एका चुकीमुळे जाऊ शकते तुमची ट्रेनची सीट; प्रवास करण्यापूर्वी वाचा रेल्वेचा नवा नियम

Indian Railway New Rule of No Waiting Policy: रेल्वेच्या नियमात महत्त्वाचा बदल झाला आहे. आता आरक्षण केलेला प्रवासी जर ट्रेनमध्ये चढला नाही तर ती सीट दुसऱ्या प्रवाशाला मिळणार आहे.

Siddhi Hande

रेल्वेचा नवीन नियम

आता जर आरक्षित प्रवासी आला नाही तर दुसऱ्याला मिळणार सीट

वेटिंग लिस्टमधील प्रवाशांना दिली जाणार माहिती

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेच्या ट्रेन तिकीच बुकिंगच्या नियमांत बदल करण्यात आले आहेत. आता तुमची सीट इतर कोणत्याही व्यक्तीला मिळू शकते. यासाठी काही नियम आहेत. आता तुम्ही जर नियुक्त बोर्डिंग स्टेशनवर वेळेत पोहचला नाही तर तुमची सीट दुसऱ्या व्यक्तीला दिली जाऊ शकते.

आधीचा नियम

रेल्वेच्या आधीच्या नियमानुसार, जर एखादा प्रवासी त्याच्या बोर्डिंग स्टेशनवरुन ट्रेनमध्ये चढलाच नाही तर टीटीई पुढच्या स्टेशनपर्यंत वाट पाहतो. तिथेह तो प्रवासी चढला नाही तर ती सीट वेटिंग लिस्टमधील प्रवाशाला दिली जाते. या प्रक्रियेला वेळ लागतो त्यामुळे अनेक सीट रिकाम्या असतात.

नवीन नियम काय? (New Railway Rule)

आता रेल्वेच्या नवीन नियमांनुसार टीटीईंना पुढील स्टेशनपर्यंत वाट पाहावी लागणार नाही. आता तिकीट तपासणीत बोर्डिंग स्टेशनवर प्रवास चढलाच नसल्यावर टीटीई लगेच सिस्टीममध्ये नोंद करतात. त्यानंतर ती सीट दुसऱ्या प्रवाशाला दिली जाते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सीट रिकामी आहे याची माहिती तुम्हाला मोबाईलवर मिळणार आहे. तुम्हाला सतत टीटीईंकडे जाऊन चौकशी करण्याची गरज नाही. फोनवरुनच तुम्हाला समजेल की, सीट रिकामी आहे की नाही. त्यानंतर तुम्ही त्या सीटवर बसू शकतात.

रेल्वेच्या नियमात बदल का केला?

ट्रेनमधील सर्व सीटचा योग्य उपयोग झाला पाहिजे. सर्व प्रवाशांना बसायला मिळायला हवे. रेल्वेच्या मते, प्रत्येक ट्रेनमध्ये ३ ते ५ सीट रिकाम्या असतात. प्रवासी वेळेवर स्टेशनवर न पोहचल्याने सीट रिकामी राहतात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. याचसोबत डिजिटल आणि आधुनिक सुविधेचा वापर केल्याने व्यवस्था आणखी मजबूत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तापमान घसरले, राज्यात पुन्हा हुडहुडी

Summer Diet Alert: उन्हाळ्यात कोणती फळं खाणं टाळावीत?

Sunday Horoscope: कामात यश, पण आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका! या ५ राशींच्या व्यक्तीचा खर्च वाढणार

T20 World Cup PAK vs SL Super 8: सामना जिंकूनही पाकिस्तान विश्वचषकात हरला; World Cupच्या स्पर्धेतून आऊट

Israel Strike on Iran: इस्त्रायलचा इराणवर भीषण हल्ला; इराणची राजधानी तेहरान उद्धवस्त?

SCROLL FOR NEXT