India Salary Hike Saam Tv
बिझनेस

India Salary Hike: गुड न्यूज! भारतात पुढच्या वर्षी ९ टक्क्यांनी होणार पगारवाढ, या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Salary Hike In 2026 Expectations: २०२६ मध्ये भारतात ९ टक्क्यांनी पगारवाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये ही पगारवाढ वेगवेगळी असणार आहे.

Siddhi Hande

भारतात २०२६ मध्ये ९ टक्क्यांनी होणार पगारवाढ

गुंतवणूक आणि धोरणात्मक पाठिंब्यामुळे होणार पगारवाढ

वेगवेगळ्या व्यनसायात वेगवेगळी पगारवाढ

सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पगारवाढीसंदर्भात एक रिपोर्ट समोर आला आहे. भारतात पुढच्या वर्षी भारतातीर कर्मचाऱ्यांची ९ टक्क्यांनी पगारवाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत एक सर्वेक्षण समोर आले आहे.

जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता असली तरीही गुंतवणूक आणि धोरणात्मक पाठिंब्यामुळे पुढील वर्षी ही वाढ होऊ शकते. मंगळवारी याबाबत सर्वेक्षण समोर आले आहे.

जागतिक व्यावसायिक सेवा फर्म AON च्या वार्षिक वेतन वाढ आणि टर्न ओव्हर २०२५-२६ च्या नुसार सर्वेक्षण केले. यामध्ये असे नमूद करण्यात आले की ८.९ टक्क्यांपेक्षा किंचित पगारवाढ होऊ शकते, जरी आर्थिक वाढ मंदावली तरीही भारतात पगारवाढ होणार आहे. जागतिक बाजारपेठेत प्रतिकूल परिस्थिती आहे. तरीही भारतात देशांतर्गत वापर आणि गुंतवणूक आणि धोरणात्मक उपाययोजनांमुळे जवचिक असणार आहे, असं यात नमूद करण्यात आले आहे.

कोणत्या क्षेत्रात किती पगारवाढ?

AON च्या वार्षिक वेतनवाढ आणि टर्नओव्हर सर्वेक्षण २०२४-२५ चे हे सर्वेक्षण ४५ उद्योंगामधील १०६० संस्थांकडून मिळालेल्या माहितीवर आहे. त्यांनी म्हलेय की, वेगवेगळ्या व्यावसायांमधील पगारवाढ ही वेगवेगळी असणार आहे २०२६ मध्ये रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधांमधील व्यावसायातील कामगारांचा पगार १०.९ टक्क्यांनी वाढण्याची शक्याता आहे. याचसोबत बँकिंग आणि वित्तीय संस्थामधील पगारवाढ ही १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. बँकिंग क्षेत्रातील पगारवाढ ही सर्वाधिक असणार आहे.

ऑटोमोटिव्ह आणि व्हेईकल मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात ९.६ टक्के पगारवाढ होण्याची शक्यता आहे. यानंतर इंजिनियरिंग डिझाइन सर्व्हिसेसमध्ये ९.७ टक्के तर रिटेल उद्योगांमध्ये ९.६ टक्के पगारवाढ होण्याची शक्यता आहे.

या सर्वेक्षणातून अजून एक माहिती समोर आली आहे की, कामगारांच्या गैरहजेरीचे प्रमाण गेल्या काही वर्षात कमी होताना दिसत आहे. २०२५ मध्ये हे प्रमाण १७.१ टक्क्यांनी कमी झाले आहे. २०२४ मध्ये १७.७ आणि २०२३ मध्ये १८.७ टक्को होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT