RBI Report 2024 Saam Tv
बिझनेस

RBI Report 2024 : साडेचार कोटी नोकऱ्या; RBI च्या अहवालात नेमकं काय? वाचा

India Produces 4.50 crore job in 2023-24: जगभरात सर्वाधिक तरुणाई हे भारतात आहे. भारतात दरवर्षी कोट्यवधी नोकऱ्यांची गरज असते. २०२३-२४ मध्ये साडेचार कोटी नोकऱ्या निर्माण झाल्याचे रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात सांगितले आहे.

Siddhi Hande

भारत हा सर्वाधिक तरुणाई असलेला देश आहे. देशात सर्वाधिक उत्पादनांची क्षमता आहे. त्यामुळे देशात नोकरीची संधी उपलब्ध होणार गरजेचे आहे. देशातील २०२३-२४ आर्थिक वर्षात ४ कोटी ६४ लाख नोकऱ्या उपलब्ध झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने याबाबत माहिती दिली आहे.

Jobs In India

२०२३-३४ मध्ये रोजगारवाढीचा दर सहा टक्के होता, असेही आरबीआयने सांगितले आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये रोजगारवाढीचा दर ३.२ टक्के होता. हा दर आता वाढला असून ६ टक्के झाला आहे. देशात मागील आर्थिक वर्षात रोजगाराची संख्या ६४.३३ कोटी होती. हेच आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ९.६८ कोटी होती. ही आकडेवारी बेरोजगारीचा दर तुलनेने जास्त असल्याचे दाखवत आहे.

सिटी बँकेच्या अहवालानुसार, जीडीपी सात टक्क्याने वाढल्यास ८०-९० लाख नोकऱ्या निर्माण होतील. देशात एक कोटी १० लाख ते २० लाख नोकऱ्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे जीडीपी वाढीमुळेदेखील नोकऱ्यांची आवश्यकता पूर्ण होणार नाही, असे सिटी बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी सांगितले आहे.

सिटी बँकेच्या हा अहवाल कामगार विभागाने चुकीचा असल्याचे सांगितले आहे. २०१७-१८ आणि २०२१-२२ या कालावधीत दरवर्षी २ कोटींहून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. देशातील बेरोजगारीचा दर २०२३-२४ मध्ये ८ टक्क्यांनी वाढला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मागील दोन वर्षात हा दर ७ टक्के आणि ७.५ टक्के होता, असे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Beetroot Benefits: हिवाळ्यात बीट खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Constitution Day : संविधान वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक; संविधान दिनी PM मोदींचा दहशतवाद्यांनाही कडक इशारा

Health Tips: हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने मिळतात जबरदस्त फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला? भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर

SCROLL FOR NEXT