“Sample representation of polymer banknotes that are durable, waterproof, and long-lasting.” saam tv
बिझनेस

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Benefits Of Polymer Notes Vs Paper Currency: तुमच्या खिशात असणारी चलनी नोट आता कधीच फाटणार नाही आणि पाण्यात भिजणारही नाहीये. हे ऐकून विश्वास बसत नाहीये ना?.. मात्र हे लवकरच खरं होण्याची शक्यता आहे. कारण, आपल्या देशात आता कागदी चलनाचे दिवस संपण्याची चिन्हं आहेत. पाहूयात यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट...

Saam Tv

तुमच्या खिशातली नोट आता कधीच फाटणार नाहीये... होय... देशाच्या मध्यवर्ती बँक म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याची योजना आखतंय. यासंदर्भात आरबीआय संचालक मंडळाच्या बैठकीत प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे देशात प्लास्टिक नोटा चलनात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, प्लास्टि

कागदी नोटांच्या छपाईचा खर्च सातत्याने वाढत असून गेल्या आर्थिक वर्षात हा खर्च 6 हजार 372 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच, आर्थिक वर्ष 2025 मध्ये 23.80 अब्ज नोटा चलनातून बाद कराव्या लागल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने 500 आणि 100 रुपयांच्या नोटांचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे दीर्घकाळ टिकणाऱ्या, सुरक्षित आणि कमी खर्चात तयार होणाऱ्या प्लास्टिक नोटा चलनात आणण्याचा विचार आरबीआय करतंय.

भारतात प्लास्टिकच्या नोटांची संकल्पना काही नवीन नाही. कारण 2012 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात पाच शहरांमध्ये 10 रुपयांच्या पॉलिमर नोटांच्या चाचणीचं नियोजन केलं गेलं होतं. देशात डिजिटल पेमेंटचं प्रमाण वाढलं असलं तरीही मोठ्या संख्येनं नागरिक अद्याप कागदी चलनांचा वापर करताहेत. विशेष म्हणजे, याआधी आरबीआयनं नाण्यांचा वापर वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अपेक्षित यश आलेले नाही. खरंतर, जगातील 60 देशांमध्ये प्लास्टिकच्या नोटांचा वापर दैनंदिन व्यवहारात केला जातोय. त्यामुळे आता भारतातही प्लास्टिकच्या नोटा कधी चलनात येणार याची नागरिकांनाही उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साखर की पिठीसाखर? आरोग्यासाठी काय सर्वाधिक फायदेशीर, जाणून घ्या

Maharashtra News Live Update: मेळघाटात धक्कादायक प्रकार; दफन केल्यानंतर 23 दिवसांनी मृतदेह काढला बाहेर

Black Tea Benefits: महिनाभर रोज एक कप कोरा चहा प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

Black spots on onion: कांद्यावरील काळे डाग ठरू शकतात धोक्याची घंटा; खाण्यापूर्वी या गोष्टी तपासा

Banking News : बँकांनी ग्राहकांच्या खिशातून उकळले ₹२६,१७० कोटी, तुमच्याही खात्यातून बँक पैसे कट करत नाहीये ना?

SCROLL FOR NEXT