LPG Consumer Count Drops by 75 Lakh Government saam tv
बिझनेस

तुमचं गॅस कनेक्शनही बंद होणार? देशातील 75 लाख ग्राहकांची संख्या घटली

75 lakh LPG Gas Connections Decline In India Reasons: देशात चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून तब्बल 75 लाख एलपीजी ग्राहकांची घट झाली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचाही समावेश आहे.

Omkar Sonawane

देशात एलपीजी गॅस ग्राहकांच्या संख्येत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशातील तब्बल 75 लाख एलपीजी ग्राहक कमी झाले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे एलपीजी गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. ग्राहकांची संख्या अचानक कमी होण्यामागे नेमकं कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 10 वर्षांत पहिल्यांदाच एलपीजी ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे. सरकारकडून गॅस कनेक्शनच्या पडताळणीसाठी कठोर पावले उचलण्यात येत असल्याने ही घट झाल्याचं सांगितलं जात आहे. सरकारने घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य केली आहे. ज्या ग्राहकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्यांना गॅस सिलिंडर बुकिंग करताना अडचणी येऊ शकतात. तसेच अशा ग्राहकांची सबसिडीही बंद केली जाऊ शकते. दुसरीकडे, सिलिंडरच्या डिलिव्हरीसाठी ओटीपी (OTP) आधारित व्यवस्था लागू करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत सिलिंडर पोहोचत असल्याची खात्री केली जाते. तसेच बनावट आणि डुप्लिकेट गॅस कनेक्शन शोधून काढण्यास मदत होत आहे. त्यामुळे अशा कनेक्शनची संख्या कमी होत असल्याचं मानलं जात आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशातील जवळपास 75 लाख एलपीजी ग्राहक कमी झाले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या सुमारे 60 हजार लाभार्थ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे एलपीजी ग्राहकांच्या संख्येतील ही घट केवळ सामान्य ग्राहकांपुरती मर्यादित राहिलेली नाही.

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम भारतातील एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावरही झाला आहे. भारत आपल्या एकूण एलपीजी गरजेपैकी निम्म्याहून अधिक गॅस परदेशातून आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा थेट परिणाम देशातील गॅस पुरवठ्यावर होतो. पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे यंदा एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही अनेकदा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) कनेक्शनला प्रोत्साहन दिलं जात आहे. एलपीजी सिलिंडरवरील अवलंबित्व कमी करून पीएनजीचा वापर वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

त्यामुळे एलपीजी ग्राहकांची संख्या कमी होण्यामागे ई-केवायसीची सक्ती, ओटीपी आधारित डिलिव्हरी आणि बनावट कनेक्शनविरोधातील पडताळणी ही प्रमुख कारणं मानली जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात बंद पडलेल्या गोडाऊन मध्ये सुरू होता तंबाखूचा कारखाना

Kitchen Vastu Tips: किचनच्या ओट्यावर चुकूनही ठेवू नका 'या' ७ वस्तू; नाहीतर, घरात होऊ शकते पैश्याची तंगी

Bank Loan : कर्जदाराचा मृत्यू झाला तर बँक कोणाकडून वसूल करणार पैसे? वाचा महत्त्वाचा नियम

Indian Traditions : हिंदू विवाहित महिला पायाच्या दुसऱ्या बोटातच जोडवी का घालतात? जाणून घ्या यामागील खास कारण

भाजपच्या ज्येष्ठ नेतृत्वातील अनुभवी चेहरा हरपला; माजी खासदाराचं निधन,राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT