भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात आज एक खास मोठा इतिहास रचला गेला आहे. ओमेगा सेकी मोबिलिटी (OSM) ने जगातील पहिले स्वयंचलित इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर ऑटो लाँच केले असून, या वाहनाची किंमत फक्त ४ लाख रुपयांपासून सुरू होते. ही गाडी आता व्यावसायिक वापरासाठी पूर्णपणे तयार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
"Auto" हे OSM च्या इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आले असून, त्यात AI-आधारित स्वायत्तता प्रणाली बसवण्यात आली आहे. हे खास करून विमानतळ, स्मार्ट कॅम्पसेस, औद्योगिक उद्याने, गेटेड कम्युनिटी आणि शहरी भागातील गर्दीच्या रस्त्यांवर ड्रायव्हरलेस कमी अंतराच्या वाहतुकीसाठी उपयोगी ठरणार आहे. वाहनाला प्री-मॅप केलेले आणि कॉन्फिगर केलेले मार्ग असल्यामुळे त्याचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि अडथळामुक्त होतो.
२०२५ च्या मॅककिन्सेच्या अहवालानुसार, २०३० पर्यंत जगभरातील गाड्या बाजारपेठेचा आकडा ६२० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचणार आहे. या पार्श्वभूमीवर "Auto" केवळ या प्रवाहाशी जुळवून घेणार नाही तर भारताला या क्षेत्रातील नेतृत्वाच्या स्थानावर बसवू शकेल. शेवटच्या मैलापर्यंत कनेक्टिव्हिटी आणि शहरी वाहतूक व्यवस्थेतील गुंतागुंत सोडवण्यासाठी हे तंत्रज्ञान सुरक्षित आणि किफायतशीर पर्याय ठरणार आहे.
ओएसएमचे संस्थापक आणि अध्यक्ष उदय नारंग यांनी यावेळी सांगितले की "ऑटो" हा केवळ एक उत्पादन नसून भारताच्या वाहतुकीच्या भविष्याला आकार देणारे पाऊल आहे. त्यांनी नमूद केले की ऑटोनोमी गाड्या आता स्वप्न नसून खरी गरज बनली आहेत आणि एआय तसेच लिडारसारखे तंत्रज्ञान भारतात बनवता येते, तेही लोकांना परवडेल अशा किमतीत. ओएसएमचे मुख्य धोरण अधिकारी विवेक धवन यांनी स्वायत्ततेचे लोकशाहीकरण हेच कंपनीचे ध्येय असल्याचे सांगितले. त्यांच्या मते इलेक्ट्रिक वाहन उद्योगातील बुद्धिमान प्रणाली सामान्य लोकांच्या दैनंदिन वापरात आणणे हे "स्वयंगती"ने सिद्ध केले आहे.
या वाहनाची अलीकडेच ३ किलोमीटरची ऑटोनोमी वाहन चाचणी पूर्ण झाली असून, त्यात सात थांबे, रिअल-टाइम अडथळा शोधणे आणि प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री यांचा समावेश आहे. ही संपूर्ण चाचणी ड्रायव्हरशिवाय पार पडली. आता कंपनी या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात व्यावसायिक स्तरावर त्याचा रोलआउट करण्याच्या तयारीत आहे. 'मेड-इन-इंडिया' ऑटोनोमी केवळ भारतातील ऑटो उद्योगाचे भविष्यच नाही तर जागतिक स्तरावर देशाला ऑटोनॉमस मोबिलिटीमधील नेत्यांच्या रांगेत आणण्याची क्षमता ठेवते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.