Coastal Road Car Fire : मुंबईतील कोस्टल रोडवरील बोगद्यात कारला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी टळली; पाहा VIDEO

Mumbai : मुंबईतील ताडदेव परिसरातील कोस्टल रोड टनेलमध्ये एका गाडीला आग लागल्याची घटना घडली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने प्रयत्न सुरू केले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे.

मुंबईतील ताडदेव परिसरातील कोस्टल रोड टनेलमध्ये आज सकाळी मोठी दुर्घटना घडली. एका गाडीला अचानक आग लागल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. गाडीला लागलेली आग मोठ्या प्रमाणात असल्याने तात्काळ दक्षिण व उत्तरमार्गे जाणारी वाहतूक संपूर्णपणे थांबवण्यात आली.टनेलमध्ये धुराचे लोट पसरल्याने गाड्यांची मोठी कोंडी झाली असून, वाहकचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नसून, नेमकी आग कश्यामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com