Gst Collection September 2023 Saam Tv
बिझनेस

GST Collection: महिन्याच्या पहिल्याच दिवशी मिळाली गोड बातमी! सप्टेंबरमध्ये 'इतक्या' कोटींचं झालं GST संकलन

Gst Collection September 2023: महिन्याच्या पहिल्याच दिवशी मिळाली गोड बातमी! सप्टेंबरमध्ये 'इतक्या' कोटींचं झालं GST संकलन

Satish Kengar

Gst Collection September 2023:

जीएसटी संकलनाच्या बाबतीत एक आनंदाची बातमी आली आहे. वित्त मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सरकारी तिजोरीत सप्टेंबर महिन्यात 1,62,712 कोटी रुपये जीएसटी जमा झाला आहे. जो सप्टेंबर 2022 च्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत 10.2 टक्के अधिक आहे.

सप्टेंबरमधील 1.63 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन ऑगस्टच्या तुलनेत 2.3 टक्के अधिक आहे. हा सलग सातवा महिना आहे जेव्हा मासिक जीएसटी संकलन 1.5 लाख कोटींच्या पुढे गेले आहे.

चालू आर्थिक वर्षातील हा चौथा महिना आहे, जेव्हा कर संकलनाने 1.6 लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पानुसार, केंद्राने जीएसटी संकलनात FY24 मध्ये 12 टक्के वाढ होण्याची अपेक्षा वर्तवली आहे. (Latest Marathi News)

गेल्या महिन्यात एकूण जीएसटी महसूल 1,62,712 कोटी रुपये होता. यामध्ये केंद्रीय जीएसटी 29,818 कोटी रुपये, सगळ्या राज्यातील जीएसटी 37,658 कोटी रुपये, आयजीएसटी 83,628 कोटी रुपये (माल आयातीवर जमा करण्यात आलेल्या 41,145 कोटी रुपयांसह) आणि उपकर 11,613 कोटी रुपये (सामान्यांच्या आयातीवर जमा केलेल्या 881 कोटी रुपयांसह) होता.

ग्रॉस जीएसटी संकलन चौथ्यांदा 1.60 लाख कोटी रुपयांच्या पुढे

केंद्र सरकारच्या निवेदनात म्हटले आहे की, “सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) महसूल वार्षिक आधारावर 14 टक्क्यांनी वाढला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात चौथ्यांदा जीएसटी संकलनाने 1.60 लाख कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

SCROLL FOR NEXT