नोव्हेंबर महिना सुरू होताच करदात्यांच्या कामांची लगबग वाढणार आहे. कारण या महिन्यात आयकराशी संबंधित अनेक महत्त्वाच्या अंतिम मुदत समोर आल्या आहेत. नोकरदारांपासून ते व्यावसायिक आणि मोठ्या कंपन्यांपर्यंत अनेकांना या तारखांचा थेट संबंध येणार आहे. कुठे TDS जमा करायचा आहे, कुठे TCS चे प्रमाणपत्र द्यायचं आहे, तर कुठे आयकर रिटर्न भरण्याची अंतिम संधी आहे. त्यामुळे नोव्हेंबरमधल्या या तारखा लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
महिन्याची सुरूवातच ७ नोव्हेंबरच्या महत्त्वाच्या मुदतीने होईल. या दिवशी कंपन्या आणि TDS-TCS कपात किंवा संकलन करणाऱ्या संस्थांना ऑक्टोबर महिन्यातली संबंधित रक्कम सरकारकडे जमा करावी लागेल. तसेच पात्र व्यवहारांसाठी Form 127 सादर करण्याचीही अंतिम मुदत आहे. त्यामुळे कंपन्यांच्या अकाउंट विभागासाठी ही तारीख महत्त्वाची ठरणार आहे. त्यानंतर १४ नोव्हेंबरला Form १३२ सादर करण्याची मुदत संपेल. मालमत्तेची खरेदी-विक्री, घरभाडे किंवा डिजिटल मालमत्तेशी संबंधित काही व्यवहारांमध्ये TDS कापलेला असेल तर त्याचे प्रमाणपत्र देणं आवश्यक असेल.
१५ नोव्हेंबर ही तारीख नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. जुलै ते सप्टेंबर २०२६ या तिमाहीतील TDS प्रमाणपत्रासाठी Form १३१, तर TCS प्रमाणपत्रासाठी Form १३३ जारी करण्याची मुदत या दिवशी संपणार आहे. यानंतर २१ नोव्हेंबरला ऑडिट लागू असलेल्या करदात्यांसाठी ITR भरण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे संबंधित करदात्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नये.
महिन्याच्या शेवटी म्हणजेच ३० नोव्हेंबरला ट्रान्सफर प्राइसिंग नियम लागू असलेल्या करदात्यांसाठी ITR भरण्याची मुदत संपणार आहे. याच दिवशी Form १४१ आणि इतर संबंधित आयकर फॉर्म भरण्याचीही अंतिम तारीख आहे. त्यामुळे करदात्यांनो, नोव्हेंबर महिन्यातील या महत्त्वाच्या तारखा अजिबात दुर्लक्षित करू नका. वेळेत करासंबंधित प्रोसेस पूर्ण करा आणि विनाकारण दंड किंवा आर्थिक अडचणी टाळा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.