PF मधून पैसे काढणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! TDS सवलतीसाठी आता भरावा लागणार नवीन फॉर्म

PF Withdrawal : पीएफमधून पैसे काढताना टीडीएस कपात होऊ नये म्हणून लागू असलेल्या नियमांची आणि आवश्यक फॉर्मची माहिती जाणून घ्या.
PF Withdrawal
PF Withdrawal saam tv
Published On: 

पीएफमधून पैसे काढायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पीएफच्या रकमेवर TDS कापला जाऊ नये, यासाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्ममध्ये बदल करण्यात आला आहे. कर वर्ष २०२६ -२७ पासून पात्र कर्मचाऱ्यांना TDS मधून सवलत मिळवण्यासाठी जुन्या फॉर्म 15G आणि 15H ऐवजी फॉर्म १२१ वापरावा लागणार आहे. त्यामुळे पीएफ काढण्याआधी नवीन नियम आणि आपली पात्रता समजून घेणं गरजेचे आहे.

फॉर्म 15G आणि 15H ऐवजी आता फॉर्म १२१

याआधी पीएफमधून पैसे काढताना पात्रतेनुसार फॉर्म 15G किंवा फॉर्म 15H सादर करता येत होता. संबंधित व्यक्तीची अंदाजित वार्षिक करपात्रता नसल्यास TDS कापू नये, अशी विनंती या फॉर्मद्वारे केली जात होती. फॉर्म 15G हा ६० वर्षांखालच्या पात्र व्यक्तींसाठी, तर फॉर्म 15H हा ज्येष्ठ नागरिकांसाठी वापरला जात होता.

मात्र, कर वर्ष २०२६ ते २७ पासून EPF मधून पैसे काढताना TDS सवलतीसाठी फॉर्म 121 वापरण्याची नवीन व्यवस्था लागू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

फॉर्म 121 भरल्याने पीएफ करमुक्त होणार का?

फॉर्म 121 भरल्यावर पीएफची संपूर्ण रक्कम आपोआप टॅक्स फ्री होत नाही. हा फॉर्म पात्र व्यक्तींना निकष पूर्ण केल्यावर TDS न कापण्याची विनंती करण्यासाठी आहे. संबंधित आर्थिक वर्षात अंदाजित एकूण उत्पन्नावर कर देय नसणे आणि इतर आवश्यक अटी पूर्ण करणे गरजेचे आहे.

PF Withdrawal
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगारवाढ कधी होणार? एरियर आणि फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट समोर

आयकर अधिनियम, २०२५ मधील कलम 393(6) अंतर्गत ही व्यवस्था नमूद करण्यात आली आहे. हा कायदा १ एप्रिल २०२६ पासून लागू झाला आहे. वैध PAN असणे आवश्यक असून, अनिवासी भारतीयांना (NRI) या सुविधेचा लाभ घेता येणार नसल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे.

EPFO कडून फॉर्म 121 साठी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर देणे, तसेच ऑनलाइन अर्ज आणि ई-साइनची सुविधा उपलब्ध करण्याबाबत निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे अर्जाची ओळख आणि प्रोसेस तपासणे सोपे होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com