Income Tax Saam tv
बिझनेस

Income Tax Rule: बायकोच्या नावावर पैसे ट्रान्सफर केल्यावर खरंच टॅक्स वाचतो का? काय सांगतो आयकर कायदा; वाचा सविस्तर

Income Tax Rule of Transferring Money To Wife: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बायकोच्या नावावर जर पैसे ट्रान्सफर केले तर टॅक्स वाचतो. परंतु त्यातून येणाऱ्या उत्पन्नावर मात्र कर लागतो.

Siddhi Hande

बायकोला दिलेल्या पैशांवर कर लागतो का?

आयकर कायदा काय सांगतो?

बायकोला दिलेल्या रक्कमेतून येणाऱ्या उत्पन्नावर लागतो कर

प्रत्येक कर्मचाऱ्याला टॅक्स हा भरावा लागतो. टॅक्समध्ये बचत करण्यासाठी करदाते वेगवेगळ्या आयडिया लावतात. टॅक्स कसा वाचवता येईल त्यासाठी बचत कशी करावी,असे प्रश्न अनेकांना पडलेले असतात. बायकोच्या नावावर पैसे ट्रान्सफर केल्यावर त्यावर टॅक्स भरावा लागत नाही, असं अनेकांना वाटते. परंतु याबाबतचा कायदा नेमकं काय सांगतो हे जाणून घ्या.

आयकर नियम काय सांगतो? (Income Tax Rule)

आयकर कायदा १९६१ च्या कलम ५६(२)(x)अंतर्गत नवऱ्याकडून मिळालेल्या कोणत्याही भेटवस्तूवर कर लागत नाही. भेटवस्तू म्हणून बायकोच्या खात्यात पैसे जमा केल्यावर कर आकारला जात नाही. या रक्कमेवर कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे बायकोला भेटवस्तू म्हणून जर रक्कम देत असाल तर ते टॅक्समुक्त आहे.

तुम्ही बायकोला जर पैसे दिले तर त्यावर टॅक्स भरावा लागत नाही. मात्र, त्यातून होणाऱ्या उत्पन्नावर मात्र कर भरावा लागतो. त्यामुळे क्लबिंग तरतुदीमुळे तुमच्यावरील कराचा भार थेट कमी होत नाही. पत्नीला पैसे ट्रान्सफर करणे किंवा भेट देणे कायदेशीर आहे. असं केल्याने करदायित्व कमी होत नाही. क्लबिंग तरतुदीमुळे तुमच्या हातात येणाऱ्या उत्पन्नावर कर आकारला जातो, असं बासीझ फंड सर्व्हिसेसचे संस्थापक सीए आदित्य सेश यांनी सांगितले.

क्लबिंग तरतुदीमुळे, तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर पैसे किंवा मालमत्ता ट्रान्सफर केली तरीही त्या मालमत्तेतून किंवा पैशातून येणाऱ्या उत्पन्नावर टॅक्स आकारला जातो.

कलम 64(1)(iv) अंतर्गत तुम्ही पत्नीला मालमत्ता किंवा रक्कम गिफ्ट म्हणून दिली तर त्यातून येणारे उत्पन्न तुमच्या उत्पन्नात परत जोडले जाईल. मालमत्तेतून येणाऱ्या उत्पन्नावर कर आकारला जातो.

उदाहरणाद्वारे समजून घ्या

उदाहरणार्थ, जर तुम्ही पत्नीला १० लाख रुपये भेट म्हणून दिले तर ती भेट करमुक्त असते.परंतु तिने त्यातील रक्कम फिक्स्ड डिपॉझिट म्हणून ठेवली त्यावर १ लाख रुपये व्याज मिळाले तर ते १ लाख रुपये तुमच्या करपात्र उत्पन्नात जोडले जाईल. जर तिने म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर त्यावर मिळणारा फायदादेखील तुमच्या करासाठी पात्र असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anti-Liquor Women Brigade:वलनी गावात दारूविरोधात महिला शक्ती; उभारली दारूविरोधी फौज

Maharashtra News Live Update : भिमाशंकर मंदिर उघडण्याआधी मुख्यमंत्र्यांचा दौरा

शेतकरी कर्जमाफीसाठी 'अॅग्रिस्टॅक'ची अट; कर्जमाफी हवी तर 'फार्मर आयडी' बंधनकारक

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

SCROLL FOR NEXT