ITR Alternatives Saam Tv
बिझनेस

ITR Alternatives: आयटीआर भरण्यात अडचण येतेय? तुमच्यासाठी 'हे' 5 पर्याय ठरतील फायदेशीर

Income Tax Returns Filing 2023: जर तुम्हाला आयटीआर भरायचा आहे पण तुमच्यासमोर अनेक अडचणी येत आहेत. तर ही माहिती नक्की वाचा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ITR Filing Deadline :

आयटीआर(ITR) अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ पर्यंत आहे. यानंतर जर तुम्ही अर्ज दाखल केला तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. जर तुम्हाला कर अर्ज भरायचा आहे पण तुमच्यासमोर अनेक अडचणी येत आहेत. तर ही माहिती नक्की वाचा

१ कोटी लोकांनी अद्याप ITR भरला नाही

आयकर ई-फायलिंग पोर्टलनुसार, आतापर्यंत सुमारे ११.५० करदात्यांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी सुमारे ४.५० कोटी लोकांनी आयटीआर अर्ज केला आहे. गेल्या वर्षी ५.५० कोटी आयकर अर्ज भरले होते. याचनुसार अजूनही १ कोटी लोकांनी आयटीआर अर्ज भरले नाही. यापैकी काही लोकांना आयटीआर भरण्यात अडचणी येत असतील. तर या ५ उपायांचा तुम्हाला नक्की फायदा होईल.

1. JSON Utility

ही सुविधा प्राप्तीकर विभागाच्या पोर्टलवर दाखवण्यात आली आहे. ऑनलाईन रिटर्न भरताना ऑटो लॉग आउट किंवा टाइम आउट सारख्या समस्या येत असतील तर तुम्ही ही सुविधा वापरु शकतात.

2. थर्ड पार्टी वेबसाइट किंवा प्रोफेशनल

आयटीआर फाईल करण्यासाठी अनेक प्रोफेशनल (Professional)उपलब्ध असतात. ज्यांना या संपूर्ण प्रक्रियेबद्दल माहिती असते. आता आयटीआर अर्ज भरण्यासाठी ४ दिवस शिल्लक आहे. त्यामुळे तुम्ही थर्ड पार्टी वेबसाइट किंवा टॅक्स प्रोफेशनलची मदत घेऊ शकता. जेणेकरुन अर्ज भरताना चूक होण्याची शक्यता कमी होईल.

3. टॅक्स हेल्पलाइन क्रंमाक

अर्ज दाखल करताना अनेकांना तांत्रिक समस्या येताना दिसत आहे. त्यावेळी तुम्ही 1800 103 0025, 1800 419 0025, +91-80-46122000, +91-80-61464700 या हेल्पलाईन क्रमांकाशी संपर्क साधू शकता.या क्रमांकावर सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत फोन करु शकतात. तर शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करु शकतात.

4. करदाता सहाय्य केंद्र

अनेक ठिकाणी करदात्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सहाय्य केंद्रे चालवली जात आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रावर संपर्क साधून तेथून मदत घेऊ शकता.

5. कर मंच आणि समुदाय

सध्या आयटीआर भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपात आहे. त्यामुळे जर कोणती अडचण आली तर अनेक ऑनलाईन प्लाटफॉर्मवर, कर तज्ज्ञ आणि व्यावसायिक कर मंच समुदायतील लोकांना मदत करतात. या ठिकाणांवरुन तुम्ही समस्यांवरचे उपाय शोधू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Dishes : तुमच्या लहानग्यांसाठी हेल्दी अन् टेस्टी नाश्ता, मुलं बोट चाटत राहतील

Pune Crime : गार वडापाव दिल्याचा राग; स्नॅक्स सेंटर मालकाला जबर मारहाण

Maharashtra News Live Updates: मविआचा मुख्यमंत्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी येणार - जयंत पाटील

W,W,W,W,W,W,W,W,W,W.. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने रणजी ट्रॉफीत राडा केला! Anshulने एकाच डावात घेतल्या 10 विकेट्स

Abeer Gulal Serial: श्री पुन्हा अडकणार संकटात, शुभ्राचा कट यशस्वी; 'अबीर गुलाल' मालिकेत नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT