Income Tax Refund Saam Tv
बिझनेस

ITR Refund: ITR भरुनही रिफंड मिळाला नाही?असू शकतात ही ८ कारणे कारणीभूत

ITR Refund Status: आयटीआर रिफंड फाइल करुन एक महिना झाला आहे. अजूनही जर तुम्हाला आयटीआर रिटर्न आला नसेल तर त्यामागे काही कारणे असू शकतात.

Siddhi Hande

आयटीआर फाइल करुन आता जवळपास महिना होत आला. ३१ जुलै ही आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख होती. आयटीआर फाइल केल्यानंतर करदात्यांना रिफंडची अपेक्षा असते. अनेकांना रिफंड आले आहेत परंतु ज्या करदात्यांना रिफंड आले नाही त्यामागे काही कारणे असू शकतात.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांच्या अकाउंटला पैसे का जमा झाले नाहीत याबाबत माहिती दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने करदात्यांच्या अकाउंटला रिफंडचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. ज्या करदात्यांचे बँक अकाउंट किंवा आयएफसी कोड बरोबर असेल. हा कोड वेरिफाय झाल्यानंतरच अकाउंटला पैसे जमा होतात. पैसे जमा होण्यासाठी तुमचे अकाउंट हे पॅन कार्डला लिंक असणे गरजेचे आहे.

रिफंड जमा होण्यासाठी किती वेळ लागतो?

आयटीआर फाइल केल्यानंतर रिफंड जवळपास ५ आठवड्यांनी करदात्यांच्या अकाउंटला जमा होतो.जर तुम्हाला आयटीआर भरुनदेखील रिफंडचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा झाले नाहीत तर तुम्ही तुमचा मेल चेक करा. तुमच्या आयटीआरमध्ये काही चुकीची माहिती भरली असेल तर त्याबाबत तुम्हाला माहिती दिली जाईल. त्याचसोबत तुम्ही तुमचा आयटीआरचा स्टेट्‍स चेक करु शकतात.

आयटीआर रिफंड स्टेट्स कसा चेक करायचा?

  • सर्वप्रथम तुम्हाला ई-फायलिंग पोर्टलवर जावे लागेल. त्यानंतर तुनचा आधार कार्ड, पॅन कार्ड नंबर आणि पासवर्ड टाकून ल़र इन करावे लागेल.

  • त्यानंतर तुम्हाला e-file हा ऑप्शन दिसेल. यानंतर इन्कम टॅक्स रिटर्नवर क्लिक करा त्यानंतर View Filed Returns वर क्लिक करा.

  • त्यानंतर तुम्हाला तिथे तुमच्या आयटीआरची माहिती दिसेल. यानंतर तुम्हाला तुमच्या रिफंडची स्थिती समजेल.यानंतर जर तुमच्या रिफंडमध्ये काही चुकीची माहिती असेल तर त्याबाबतदेखील तुम्हाला सांगण्यात येते.

रिफंड न येण्याची कारणे काय?

  • जर तुमच्या पॅन कार्डची माहिती चुकीची असेल किंवा आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला रिफंड येण्यास अडचणी येऊ शकतात.

  • चुकीचा बँक अकाउंट नंबर

    जर तुम्ही बँक अकाउंटची चुकीची माहिती भरली तर तुम्हाला रिफंड येण्यास प्रॉब्लेम येऊ शकतात.

  • केवायसी

    जर तुम्ही केवायसी केले नसेल तरीही तुम्हाला आयटीआर रिफंड मिळण्यास प्रॉब्लेम येऊ शकतात.

  • तुम्ही तुमच्या अकाउंटची योग्य माहिती दिली नसेल तरीही तुम्हाला रिफंड येऊ शकणार नाही.

  • तुम्ही आयटीआरमध्ये दिलेले अकाउंट हे जर बंद झाले असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही.

  • तुमचं बँक अकाउंट जर प्री वॅलिडेट नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुमचे बँक अकाउंट वॅलिडेट करणे अनिवार्य आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT