IIT Campus Placement Saam Tv
बिझनेस

IIT Campus Placement: मुंबईतल्या २२ विद्यार्थ्यांना कोटींचे पॅकेज, पण IIT कॅम्पस प्लेसमेंटमधून नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण घटले

IIT Campus Placement 2024: आयआयटी कॅम्प्सम प्लेसमेंटमध्ये २२ विद्यार्थ्यांना तब्बल १ कोटींचे पॅकेज मिळाले आहे. काहींना कोट्यवधी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. परंतु काही विद्यार्थ्यांना कमी पगाराच्या नोकरीत समाधान मानावे लागले आहे.

Siddhi Hande

IIT Placement: प्रत्येक विद्यार्थ्याला आपले करिअर खूप चांगले घडवायचे असते. त्यासाठी अनेकजण खूप मेहनत करतात. अनेकजण इंजिनियरिंग हे आपलं करिअर म्हणून निवडतात. इंजिनियरसाठी देशातील सर्वात मोठे विद्यापीठ किंवा शिक्षणसंस्था म्हणजे आयआयटी. नुकतेच आयआयटी मुंबई कॅम्प्स इंटव्ह्यूमध्ये अनेकांना एक कोटींहून अधिकचे पॅकेज मिळाले आहे.

आयआयटी मुंबईमध्ये २२ विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांपेक्षा जास्त पॅकेज मिळाले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. परंतु यंदा कॅम्प्स मुलाखतीतून मिळणाऱ्या नोकरीचे प्रमाण कमी झाले आहे. यंदा १४७५ विद्यार्थ्यांना कॅम्प्स प्लेसमेंटमधून जॉब मिळाले आहे. गेल्या वर्षी १७८८ विद्यार्थ्यांना कॅम्प्स प्लेसमेंटमधून नोकऱ्या मिळाल्या होत्या. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली नाही ते विद्यार्थी मात्र नाराज झाले आहेत.

या वर्षी आयआयटी मुंबईमध्ये कॅम्प्स प्लेसमेंटसाठी २,४१४ विद्यार्थ्यांपैकी १९८९ विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. यापैकी १,६५० विद्यार्थ्यांना नोकरीच्या ऑफर मिळाल्या आहेत.कॅम्प्स मुलाखतीत नोकरी मिळण्याचे प्रमाण ७.७२ टक्क्यांनी घटले आहे.

या वर्षीच्या कॅम्प्स प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे वेतन ७.७ टक्क्यांनी वाढले आहे. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना परदेशी कंपन्यानी ऑफर दिल्या आहेत. यावर्षी तब्बल ८६ विद्यार्थ्यांना परदेशी कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. आयआयटी कॅम्प्समध्ये अनेक विद्यार्थ्यांची मात्र निराशा झाली आहे. काही विद्यार्थ्यांनी कोट्यवधी रुपयांचे पॅकेज घेतले आहेत तर काही विद्यार्थ्यांना ४-६ लाखांच्या पॅकेजवर समाधान मानावे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT