प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणानंतर चांगली नोकरी मिळावी, असे वाटतं असते. अनेक कॉलेजद्वारे प्लेसमेंट दिली जाते. यंदा आयआयएम मुंबईमध्ये विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक कंपन्यांनी विद्यार्थ्यांना नवी संधी दिली आहे.
आयआयएममध्ये प्लेमसमेंट प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच तब्बल २७६ विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली आहे. प्लेसमेंट प्रक्रिया पुढील एक-दोन महिने चालणार आहे. त्यामुळे आणखी काही विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट पुढील काही दिवसात केले जाणार आहे. काही विद्यार्थ्यांची प्लेसमेंट काही दिवसात होईल, अशी आशा आयआयएमने व्यक्त केली आहे.
या वर्षी आयआयएम मुंबईमधून जवळपास ४८० मुलांची बॅच शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांसाठी कॅम्प्स पेल्समेंट राबवली जात आहे. यापूर्वीच २ ते ३ वर्ष काम करुन उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची पेल्समेंट प्रक्रिया सुरु आहे. त्यामध्ये अनेक खाजगी कंपन्यांनी विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
खासगी कंपन्यांकडून १४२ विद्यार्थ्यांना प्री प्लेसमेंट ऑफर्स दिल्या आहेत. तर त्यातील १३४ विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली आहे, अशी माहिती आयएएमने दिली आहे. (IIM Placement 2024)
यावर्षी आयएएममध्ये फ्रेशर्स विद्यार्थ्यांची प्लेसनमेंट जानेवारीमध्ये होणार आहे. १७ ते १८ नवीन कंपन्या सहभागी झाल्या आहेत.त्यामध्ये जागतिक पातळीवरील नामांकित गोल्डमन स्रक्स कंपनीचा समावेश आहे. यंदा विद्यार्थ्यांच्या पॅकेजमध्येही चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. जानेवारी महिन्यात प्लेसमेंट जानेवारीमध्ये होतील, असं सांगितलं आहे.
दरम्यान गेल्या वर्षी आयआयएममधील प्लेसमेंटमध्ये १८० कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यात १७० विद्यार्थ्यांना प्री प्लेसमेंट ऑफर्स दिल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक पॅकेज ५४ लाख वार्षिक पगाराचे पॅकेज दिले होते. (IIM Placement)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.