IDFC FIRST Bank vs HDFC Bank  saam tv
बिझनेस

Home Loan Interest : HDFC की IDFC , कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? समजून घ्या सोप्या शब्दात हिशोब

IDFC FIRST Bank vs HDFC Bank : IDFC FIRST Bank आणि HDFC Bank यांच्या गृहकर्जाच्या व्याजदरांची तुलना केल्यावर कळेल की, कोणती बँक कमी व्याजदर देते.

Sakshi Sunil Jadhav

स्वतःचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण घर खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम लागते. त्यामुळे अनेकजण बँकेकडून होम लोन घेतात. समजा, तुम्ही ५० लाख रुपयांचं गृहकर्ज घेण्याचा विचार करताय. तर अशावेळी दोन बँकांच्या व्याजदरात फक्त ०.२५ ते ०.५० टक्क्यांचा फरक असला, तरी संपूर्ण कर्जाच्या कालावधीत तुमचे हजारो किंवा लाखो रुपये वाचू शकतात.

त्यामुळे होम लोन घेण्याआधी कोणती बँक कमी व्याजदरात कर्ज देते, याची तुलना करणं महत्त्वाचं आहे. सध्या IDFC FIRST Bank आणि HDFC Bank या दोन खासगी बँकांमधल्या गृहकर्जाच्या व्याजदरांची चर्चा होते. या दोन्ही बँकांच्या व्याजाच्या प्रोसेसिंग फी आणि कर्जाच्या अटी जाणून घेऊया.

IDFC FIRST Bank चे होम लोन व्याजदर

IDFC FIRST Bank मध्ये गृहकर्जाचं व्याजदर वार्षिक ७.७५ टक्क्यांपासून सुरू होतं. हे दर ग्राहकाचा सिबिल स्कोअर, उत्पन्न आणि कर्जाच्या कालावधीनुसार बदलतात. ७५० किंवा त्यापेक्षा जास्त सिबिल स्कोअर असलेल्या ग्राहकांना तुलनेनं कमी व्याजदराचा फायदा मिळू शकतो. या बँकेत १० कोटी रुपयांपर्यंत गृहकर्ज घेता येते. कर्जफेडीसाठी ३० वर्षांपर्यंतचा कालावधी मिळतो. प्रोसेसिंग फी ०.५० ते १ टक्के जास्त GST असू शकते.

HDFC Bank चे होम लोन व्याजदर

HDFC Bank मध्ये गृहकर्जाचे मानक फ्लोटिंग व्याजदर वार्षिक ८.१० ते १३.५५ टक्क्यांदरम्यान आहेत. पण खास ऑफर आणि चांगला क्रेडिट स्कोअर असेल तर काही ग्राहकांना ७.७० टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळू शकतो. फिक्स्ड रेट गृहकर्जाचे व्याजदर ८.५० टक्क्यांपासून सुरू होतात. इथेही १० कोटी रुपयांपर्यंत कर्ज आणि ३० वर्षांपर्यंत परतफेडीची सुविधा आहे.

कोणती बँक ठरेल फायदेशीर?

IDFC FIRST Bank - कमी सुरुवातीचा व्याजदर आणि डिजिटल कर्ज मंजुरी हवी असेल तर हा ऑप्शन बेस्ट आहे.

HDFC Bank - कमी प्रोसेसिंग फी, ग्राहक सेवा आणि विशेष व्याजदर सवलतींचा फायदा मिळू शकतो.

प्रीपेमेंट चार्ज - दोन्ही बँकांमध्ये फ्लोटिंग रेट गृहकर्जावर सामान्यत: शून्य प्रीपेमेंट चार्ज आहे.

महत्त्वाची टीप: वरील व्याजदर दिलेल्या माहितीनुसार आहेत. प्रत्यक्ष व्याजदर बँकेच्या अद्ययावत ऑफर आणि ग्राहकाच्या पात्रतेनुसार बदलू शकतात. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी संबंधित बँकेकडून दरांची खात्री करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अध्यक्ष योगेश सोमण यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर

Royal Enfield : रॉयल एनफिल्डचं नवीन मॉडेल! 743 सीसी इंजिन, ५ रायडिंग मोड्स, काय आहे किंमत?

Thigh size: जाड मांड्या असलेल्या व्यक्तींना हार्ट अटॅकचा धोका कमी? संशोधनातून धक्कादायक बाब समोर

Gold Rate Today : सोनं अचानक इतकं कसं महागलं? सुवर्णनगरीत दरांची मोठी झेप; चांदीचीही जोरदार मुसंडी

Sleeping With Socks : पाय थंड पडतात म्हणून मोजे घालता? आरोग्यावर होतो मोठा परिणाम, वाचा...

SCROLL FOR NEXT