आजकाल आधारकार्ड शिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही. आधारकार्ड हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे, जो प्रत्येकाशी शेअर करता येत नाही. कारण आधारकार्ड क्रमांकाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात ऑनलाइन फसवणूक केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत आधार कार्ड वापरकर्ते मास्क्ड आधार कार्ड वापरू शकतात. ओळखपत्र व्हेरिफाय करण्यासाठी मास्क्ड आधारकार्ड वापरले जाऊ शकते.
प्रत्येक आधारकार्ड मध्ये १२ अंकी कोड असतो. हा युनिक कोड बायोमेट्रिक ओळखीसह येतो. यामध्ये वापरकर्त्यांची फिंगरप्रिंट ओळख असते. यालाच बायोमेट्रिक म्हणतात. वापरकर्त्यांच्या सोयीसाठी, UIDAI द्वारे एक नवीन मोबाइल ॲप जारी करण्यात आले आहे. याला mAadhaar म्हणून ओळखले जाते. हे अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्ते वापरू शकतात. आपल्या आधारकार्ड ला अजून सुरक्षित करण्यासाठी मास्क्ड आधार कार्ड वापरले जाते. मास्क्ड आधारकार्ड हे सुरक्षित आहे, ज्याद्वारे पूर्ण आधारकार्डवरील क्रमांक शेअर केल्याशिवाय तुमची ओळख व्हेरिफाय करता येईल. मास्क्ड आधारकार्डवर फक्त आधारचे अखेरचे चार क्रमांक दिसतात.
मास्क्ड आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे?
सर्व प्रथम, UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या (myaadhaar.uidai.gov.in)
वेबसाइटवरील 'लॉगिन' पर्यायावर क्लिक करा.
तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा अचूक भरा.
तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP टाकावा.
एकदा लॉग इन केल्यानंतर, 'आधार डाउनलोड करा' पर्यायावर क्लिक करा.
डाउनलोड करताना, 'मास्क्ड आधार' या पर्यायावर क्लिक करा.
डाउनलोड केलेल्या मास्क्ड केलेल्या आधारवर, तुमच्या आधार क्रमांकाचे शेवटचे चार अंक लपवले जातील, ज्यामुळे तुमची सुरक्षितता वाढते. पूर्ण आधार क्रमांक देणे आवश्यक नाही. मास्क्ड आधारकार्ड फक्त ओळख पडताळणीसाठी वापरले जाऊ शकते. तुम्हाला तुमचा संपूर्ण आधार क्रमांक कोणत्याही संस्थेला देणे आवश्यक असल्यास, तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. तसेच, आधारकार्ड क्रमांक केवळ विश्वासार्ह लोकांशी शेअर करावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.