Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: AI च्या मदतीने अभ्यास, तिसऱ्या प्रयत्नात IAS, विभोर भारद्वाज यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IAS Vibhor Bhardwaj: विभोर भारद्वाज यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले आहे. त्यांनी AI च्या मदतीने अभ्यास केला आहे.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षेत चांगली रँक मिळवून आयएएस किंवा आयपीएस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. असंच स्वप्न विभोर भारद्वाज यांनी पाहिलं आणि पूर्णदेखील केले. त्यांनी खूप कठीण परिस्थितीतून हे यश मिळवलं आहे. त्यांच्या या यशामुळे सर्वांनाच आनंद झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना AI चा वापर करुन अभ्यास केला आहे. (UPSC Success Story)

UPSC परीक्षेत १९वी रँक

विभोर भारद्वाज (IAS Vibhor Bhardwaj) हे मूळचे उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहेत. त्यांना २०२२ मध्ये यूपीएससी परीक्षेत ७४३ रँक प्राप्त केली आहे. तेव्हा त्यांना आयएएस अधिकारी होता आले नाही. त्यामुळे त्यांना २०२४ मध्ये तिसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. यावेळी त्यांना १९रँक प्राप्त झाली. त्यानंतर ते आयएएस अधिकारी झाले.

विभोर यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीच्या हंसराज कॉलेजमधून फिजिक्सचा अभ्यास केला. त्यांनी MSc डिग्री प्राप्त केली आहे.यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली. यासाठीही त्यांनी फिजिक्स हा ऑप्शनल विषय निवडला. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय हे यश मिळवले आहे. त्यांनी ऑनलाइन नोट्स बनवले आणि यूपीएससी मेन्सचा पूर्ण अभ्यासक्रमाचा अभ्यास केला.

UPSC CSE परीक्षेसाठी त्यांनी T20 मॅचसारखी स्ट्रॅचेजी केली. त्यानी रोज सर्व विषयांचा थोडा थोडा अभ्यास केला. २०२२ मध्ये त्यांनी ७४३ रँक प्राप्त केली. त्यानंतर २०२३ मध्ये इंटरव्ह्यू राउंडमधून ते बाहेर पडले. परंतु त्यांनी पुन्हा प्रयत्न केले आणि २०२४ मध्ये १९ रँक प्राप्त केली.

विभोर यांच्या अभ्यासासाठी AI ने खूप मदत केली. ते एआयच्या माध्यमातून मॉक इंटरव्ह्यू द्यायचे. ते या सगळ्यामधून खूप काही शिकले. आपल्या चुका सुधरवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng 3rd Test : रिषभ पंत पाठोपाठ केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदरही तंबूत; लॉर्ड्सचा कसोटी सामना भारताच्या हातून निसटला?

Jalna News: अरे बापरे...! दारू प्यायलेला मुख्याध्यापक डुलक्या देत वर्गातच झोपला अन् तिथेच... व्हायरल Video पाहाच

Supreme Court : नवरा-बायकोच्या खासगी कॉल रेकॉर्डिंगचा पुरावा ग्राह्य धरला जाणार; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra Live News Update: अंबरनाथमधील बारचालकांचा एकदिवसीय बंद; सरकारच्या करवाढीविरोधात आंदोलन

Horrific Accident : गाय वाचवताना घडली भयंकर दुर्घटना; भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये बाप-लेकाचा समावेश

SCROLL FOR NEXT