Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: शाळेसाठी रोज १० किमीची पायपीट, सलग दोनदा अपयश, तिसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS वीर प्रताप सिंह यांचा प्रवास

Success Story Of IAS Veer Pratap Singh: यूपीएससी परीक्षा पास करणे हे खूप अवघड आहे. वीर सिंह प्रताप यांना दोनदा अपयश आले. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.

Siddhi Hande

प्रत्येकाचे काही न काही स्वप्न असते. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. दरम्यान, अनेकदा या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो परंतु कितीही अडचणी आल्या तरीही त्यावर मात करता यायला हवी.असंच काहीसं वीर प्रताप सिंघ राघव यांनी केलं. खूप गरीब परिस्थितीतून त्यांनी मार्ग काढला आणि मोठ्या जिद्दीने यूपीएससी परीक्षा पास केली.

वीर प्रताप सिंघ राघव हे बुलंदशहर येथील दलतपूर गावातील रहिवासी. एका लहानश्या खेडेगावात त्यांचे बालपण गेले. शेतकऱ्याच्या लेकाने यूपीएससी परीक्षा पास करुन सर्वांसमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी परिस्थिती खूपच हालाखीची होती. त्यांची सर्व कमाई फक्त खाण्यापिण्याच्या वस्तू आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी जायचे. परंतु त्यांना आपल्या लेकावर पूर्ण विश्वास होता. आपला मुलगा नक्की काहीतरी मोठं करेन, असं त्यांना वाटायचं.

दोनदा अपयश

वीर प्रताप सिंह राघव यांनी अलीगढमधील मुस्लिम विश्वविद्यालयातून शिक्षण घेतले. त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंग केले. यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. वीर प्रताप यांना पहिल्या प्रयत्नात अपयश मिळाले. पहिल्या प्रयत्नात अपयश मिळाल्यानंतरही त्यांनी दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. परंतु तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी सतत मेहनत केली आणि त्याचं फळ त्यांना मिळालं. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आहे.

वीर प्रताप सिंह यांनी प्राथमिक शिक्षण आपल्या शाळेतून घेतले. त्यांनी शिकरापुर येथील सरस्वती विद्या मंदिर येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.त्यांना शाळेसाठी रोज पाच किलोमीटर चालत जावे लागायचे. त्यामुळे रोज ते १० किलोमीटर चालत जायचे. त्यांच्या गावात ना कोणता पूल होता ना इतर रस्ते चांगले होते. त्यांना नदी पार करुन जावे लागायचे.आयएएस वीर प्रताप यांनी २०१९ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Archery World Championships: सुवर्ण कामगिरी; भारताच्या तिरंदाजांनी इतिहास रचला

Nagpur: दारूबंदी असतानाही विक्री; एकाला अवैध दारूसाठ्यासह अटक

दहिसरमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी, पाहा व्हिडिओ

Instant Face Pack: अर्ध्या तासात येईल चेहऱ्यावर ग्लो, वापरा हा घरात तयार केलेला फेसपॅक

SBI Clerk 2025 : SBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! क्लर्क पदासाठी मोठी भरती, ६५८९ रिक्त जागा

SCROLL FOR NEXT