Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: दोनदा अपयश, आईसाठी जिद्दीने क्रॅक केली UPSC, पण यश बघायला तिच नव्हती, IAS रुपल राणा यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IAS Rupal Rana: आयएएस रुपल राणा यांनी खूप कमी वयात यूपीएससी परीक्षेत यश मिळवले. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. ही परीक्षा क्रॅक करायची असेल तर फक्त एकच मार्ग आहे तो म्हणजे मेहनत. तुम्ही जर मेहनत केली तर त्याचे फळ तुम्हाला मिळतेच. यूपीएससी परीक्षा पास झाल्यावर तुम्ही आयएएस किंवा आयपीएस ऑफिसर होऊ शकतात. प्रशासकीय सेवेत काम करुन देश बदलण्यासाठी काही योगदान देऊ शकतात. त्यामुळे ही परीक्षा खूप महत्त्वाची मानली जाते. ही परीक्षा रुपल राणा यांनी क्रॅक केली आहे.

रुपल राणा यांनी यूपीएससी परीक्षेत २६ वी रँक प्राप्त केली आहे. त्या २०२४ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेत यश मिळवले आहे. त्यांनीही खूप कठीण परिस्थितीत अभ्यास केला आहे.

कोण आहेत रुपल राणा? (Who Is IAS Rupal Rana)

रुपल राणा या उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील बडोत गावच्या रहिवासी आहेत. त्यांचे कुटुंब दिल्लीत राहते. त्यांचे वडील जसवीर राणा हे दिल्ली पोलिसमध्ये असिस्टंट सब इंस्पेक्टर आहे.

रुपल राणा यांचे शिक्षण

रुपल राणा यांनी आपले शालेय शिक्षण बागपतमधील जेपी पब्लिक स्कूलमधून केले. त्यांनी २०वीत चांगले गुण मिळवले. त्यानंतर ११वी आणि १२वीचे शिक्षण पिलान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून केले.

रिझल्टआधी आईचे दुःखद निधन

रुपल राणा यांच्या आईचे आपले मुलीने मोठ्या पदावर काम करावे हे स्वप्न होते. त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक करावी अशी इच्छा होती. आईसाठी रुपल यांनी २०२३ मध्ये तिसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. परंतु या परीक्षेच्या काळातच त्यांची आई गंभीर आजारी पडली. रुपल यांनी आईकडे लक्ष देता देता अभ्यास केला. परंतु निकाल जाहीर होण्याआधीच त्यांच्या आईने शेवटचा श्वास घेतला. आईला त्यांच्या मुलीचे स्वप्न पूर्ण करताना बघता आले नाही.

यूपीएससीमध्ये दोनदा अपयश (UPSC Success Story)

रुपल राणा यांना यूपीएससी परीक्षा क्रॅक करणे खूप कठीण होते. त्यांना दोन वेळा अपयश मिळाले. त्यात आईचे दुःखद निधन झाले. परंतु त्यांनी हिम्मत नाही सोडली आपले प्रयत्न सुरु ठेवले. त्यांनी शेवटी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केलीच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saina Nehwal: सायना नेहवाल - पारूपल्ली कश्यप विभक्त, ७ वर्षांचा सुखी संसार मोडला; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Plane Crash: उड्डाण घेताच काही सेकंदात विमान कोसळलं, उडाला मोठा भडका; परिसरात काळेकुट्ट धुरांचे लोट; अपघाताचा थराराक VIDEO

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT