Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: जिद्द! लग्नानंतर चार वर्षांनी दिली UPSC; संसार अन् मुलाचा सांभाळ करत झाल्या IAS; पुष्पलता यादव यांचा प्रवास

Success Story of IAS Pushpalata Yadav: आयएएस पुष्पलता यादव यांनी घर आणि मुलाचा सांभाळ करत यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांचा हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे.

Siddhi Hande

मुलींचे लग्न झालं त्यांना मुले झाली की त्यांचं करिअर संपतं, असं अनेकजण म्हणतात. परंतु कधीही कोणत्याही वयात काहीही करायची तयारी ही स्त्रियांमध्ये असते. त्यामुळे कोणत्याही वयात आपण कोणतीही परीक्षा देऊन यशस्वी होऊ शकतो. असंच काहीसं आयएएस पुष्पलता यादव यांच्यासोबत झालं. त्यांनी लग्नानंतर चार वर्षांनी यूपीएससी परीक्षा दिली आणि त्यात यशदेखील मिळवलं. त्यांचा हा प्रवास प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी आहे.

आयएएस पुष्पलता यादव (IAS Pushpalata Yadav)

दरवर्षी लाखो विद्यार्थी यूपीएससी परीक्षेला बसतात. प्रत्येकाची एक वेगवेगळी स्टोरी असते. आयएएस पुष्पलता यादव यांनी संसार आणि मुलांची जबाबदारी सांभाळत अभ्यास केला आणि ही परीक्षा उत्तीर्ण केली. यासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबियांचा खूप सपोर्ट मिळाला. त्यांनी फक्त परीक्षा पास केली नाही तर त्यांची आयएएस पदासाठी नियुक्तीदेखील झाली.

शिक्षण

पुष्पलता यादव या मूळच्या हरियाणाच्या रहिवासी आहेत. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या मूळ गावी झाले. त्या लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी १२वीनंतर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनदेखील केले. यानंतर त्या सरकारी नोकरीच्या परीक्षेची तयारीदेखील करत होत्या. परंतु याच काळात त्यांचे लग्न झाले.

लग्नानंतर लगेचच दोन वर्षात त्यांना मुलगा झाला. काही काळ संसारात रमल्यानंतर त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मुलगा दोन वर्षाचा झाल्यानंतर त्यांनी अभ्यास केला.

पुष्पलता यांच्या या निर्णयात त्यांच्या कुटुंबियांनी आणि नवऱ्याने खूप साथ दिली. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. पहिल्या दोन प्रयत्नात त्यांना यश मिळाले नाही. परंतु तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी ८०वी रँक प्राप्त केली. त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. लग्नानंतर आपली स्वप्ने अर्धवट राहतात, असं अनेकजण म्हणतात. परंतु पुष्पलता यांनी त्यांना चुकीचं ठरवलं. त्यांनी आपल्या आत्मविश्वासाने आणि मेहनतीने खूप मोठं यश मिळवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT