Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: डॉक्टर व्हायचं स्वप्न भंगलं, कोरोना काळात ऑनलाइन अभ्यास, पहिल्याच प्रयत्नात IAS; तिची सक्सेस स्टोरी वाचा

IAS Officer Taruni Pandey Success Story: यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूट्यूबवरुन अभ्यास करुन हीच परिक्षा देऊन पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालेल्या तरुण पांडेय यांची यशोगाथा जाणून घेऊया.

Siddhi Hande

प्रत्येकाची काही न काही स्वप्ने असतात. आपलं प्रत्येक स्वप्न पूर्ण होतच असं नाही. परंतु त्यातूनही खचून न जाता पुन्हा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला यश हे येतंच. असंच यश पश्चिम बंगालच्या तरुणी पांडेय यांना आलं.तरुणी पांडेय आज आयएएस म्हणून कार्यरत आहे.

तरुणी पांडेय यांनी झारखंडमघ्ये आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी इंग्लिश लिटरेचरमध्ये मास्टर्स डिग्री प्राप्त केली आहे. तरुणी पांडेय यांना डॉक्टर व्हायचे होते. तिसरीत असताना त्यांनी डॉक्टर व्हायचे स्वप्न पाहिले होते. मात्र, काही कराणांमुळे त्यांना एमबीबीएसचे शिक्षण सोडावे लागले आहे. त्यामुळे त्यांनी दुसरा करिअर ऑप्शन निवडला. त्यांनी यूपीएएसी परीक्षा दिली. (Success Story)

तरुणी पांडेय यांच्या घरात एका व्यक्तीचे निधन झाले. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या सरकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागल्या. याच काळात त्यांनी सरकारी अधिकारी व्हायचे ठरवले आणि सिस्टीममध्ये बदल घडवून आणण्याचा निर्णय घेतला.

तरुण पांडेय यांनी २०२० मध्ये प्रिलियम्स देण्याचे ठरवले. मात्र, परिक्षेच्या चार दिवस आधी कोविड आला त्यामुळे लॉकडाउन लागले. त्यामुळे त्यांनी २०२१ मध्ये प्रिलियम्स परीक्षा दिली. ही त्यांच्यासाठी शेवटची संधी होती. (IAS Taruni Pandey Success Story)

२०२१ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली आणि १४व्या रँकसह पास झाल्या. तरुणी यांनी फक्त ४ महिन्यातच हे यश मिळवलं. त्यांनी कोणतेही क्लासेस न लावता यूट्यूबवरुन सेल्फ स्टडी केले. त्यांच्या या प्रयत्नाला यश हे मिळाले. त्या आज आयएएस ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. (UPSC Success Story)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

SCROLL FOR NEXT