Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: बॅडमिंटनमध्ये १७ पदके, एका घटनेने संपूर्ण आयुष्यचं बदललं; आज कुहू गर्ग आहेत IPS ऑफिसर

IPS Kuhoo Garg Success Story: यूपीएससी परीक्षा ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. हीच परीक्षा पास करुन कुहू गर्ग यांनी सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

Siddhi Hande

प्रत्येक मुलीला आपल्या वडिलांसाठी काहीतरी करायचे असते. ती नेहमी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते. त्यांची मान कशी उंचावेल, याचा विचार करत असते. असाच विचार कुहु गर्ग यांनी केला आणि आपल्या वडिलांना आपला गर्व वाटेल, असं काम त्यांनी केले. उत्तराखंड पूर्वचे डीजीपी अशोक कुमार यांची लेक कुहू हिने यूपीएससी परीक्षा पास करत वडिलांचे नाव उंचावले आहे.

कुहू गर्ग या एक बॅडमिंटनपटू आणि नॅशनल खेळाडू आहे. त्यांनी नॅशनल- इंटरनॅशनल स्पोर्टमध्ये १७ पेक्षा जास्त मेडल जिंकले आहे.तरीही त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. (IAS Kuhoo Garg Success Story)

कुहू गर्ग या ९-१० वर्षांच्या असल्यापासून बँडमिंटन खेळत होत्या. त्यांच्या आईवडिलांना खेळाची आवड होती.त्यामुळे त्यांनी कुहू यांना स्पोर्ट्समध्ये मार्गदर्शन केले. लहानपणापासून आपल्या वडिलांपासून प्रेरणा घेत असलेल्या कुहू गर्ग यांनीही देशसेवा करण्याचा निर्णय घेतला.

कुहू गर्ग यांचे वडील अशोक कुमार हे सरकारी अधिकारी होते. त्यांची नेहमी ट्रान्सफर व्हायची. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये राहून शिक्षण घेतले. त्यांनी प्राथमिक शिक्षण देहारादून येथून घेतले. त्यानंतर ८वी ते १२वी पर्यंतचे शिक्षण दिल्लीत घेतले. यानंतर २०१८ मध्ये एसआरसीसीमधून इकोनॉनिक्स ऑनर्समध्ये डिग्री प्राप्त केली. (IAS Success Story)

कुहू यांचे आयुष्य खूप सुखकर चालले होते. त्यांना स्पोर्ट्समध्ये करिअर करायचे होते. मात्र, त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली. लहानपणी बॅडमिंटन खेळत असताना त्यांना अचानक एक दिवस लागले. त्यामुळे त्यांची सर्जरी करावी लागली. त्यांना वर्षभर बेडरेस्ट करायचा सांगितले होते. याच १ वर्षाच्या काळात त्यांनी यूपीएससी परिक्षेची तयारी केली. त्यांनी २०२३ यूपीएससी परिक्षेत ४५ रँक मिळवली आहे. त्या आता सध्या आयपीएस ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. (Kuhoo Garg)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक ; उद्धव ठाकरेंनी दिला कानमंत्र

Shrirampur Vidhan Sabha : श्रीरामपूरमध्ये महायुतीचा पेच कायम; शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांचे अर्ज कायम

Bus Accident : दोन बसचा समोरासमोर अपघात; २५ प्रवासी जखमी, कन्नड- चाळीसगाव बायपास रोडवरील घटना

Nashik News : दिवाळीनिमित्त परिवार बाहेरगावी; बांधकाम व्यवसायिकाच्या घरी २२ लाखांची चोरी

US Election : मतदानाआधी शेवटच्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प नाचले; माजी राष्ट्राध्यक्षांची तुलना, VIDEO

SCROLL FOR NEXT